Перейти к содержимому

श्री गोकुळाष्टमी उत्सव - गोपाळकाला - श्री दत्त देवस्थान, कोंडगाव (साखरपा)

श्री दत्त देवस्थान, कोंडगाव (साखरपा)

0:00 / 0:00

श्री गोकुळाष्टमी उत्सव - गोपाळकाला - श्री दत्त देवस्थान, कोंडगाव (साखरपा)

1 291 просмотр · 1 мес. назад
श्री दत्त देवस्थान, कोंडगाव (साखरपा)
26,6 тыс. подписчиков
1 291 просмотр · 1 мес. назад
छायाचित्रण - रोहन प्रवीण हर्डीकर, देवरुख ।। श्री गोपालकृष्ण प्रसन्न ।। श्री गोकुळाष्टमी उत्सव माहिती श्री गोकुळाष्टमीचे रात्री श्री दत्त मंदिरात जमणे. रात्री १२ वाजता 'राधा कृष्ण, गोपाळ कृष्ण' चा गजर करणे, फेर धरणे इ. त्यानंतर श्री कृष्णाची आरती करणे. सुंठवडा - प्रसाद वाटणे. गोपाळकाला उत्सव माहिती पेठेमध्ये सर्वांकडून दही दूध ताक वैगरे आणणे. दहीहंडी बांधणे. प्रथम श्री दत्तगुरूंची आरती व प्रार्थना करणे. हरी रे रामा गोविंदा, गोविंदा रे गोपाळा असा गजर करत अंगणात उतरणे. संपूर्ण दहीकाला कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत गजर म्हणत राहणे. नमस्कार सूर्य नमस्कार मारुती नमस्कार डबल नमस्कार जोर बैठका चक्रदंड कमान टाकणे मुंडा मारणे गोलांटी उडी हातावरची उडी शिरसासन फुगडी कुलूप किल्ली चानी कुस्ती सुपारी फोडणे पिंगा - गाणे - पिंगा गं बाई पिंगाsss दंड फुगडी - गाणे - दंड फुगडी दंडाची । बाई वेडी रायाची ।। राजा गेला लष्करा । चार आंबे कुस्करा ।। एक आंबा नासला । गंगेत नेऊन टाकला ।। गंगेला आला लोंढा । भिजला माझा गोंडा ।। गोंड्याच्या पदरी रुपया । भाऊ माझा शिपाया ।। शिपायाची होडी । हळद लावूनी फोडी ।। फुगड्डी फ्फु….. बस फुगडी - गाणे - एक दळा सारू । आठ खडे मांडू ।। एक खडा खोटा । सई आली पोटा । । सईच्या कानी बुगड्या । आम्ही घालू फुगड्या ।। फुगड्डी फ्फु... कोंबडा - गाणे - आकाबाईचा कोंबडा । आला माझ्या दारी ।। घालीन चारा - पाजीन पाणी । हळद लावून पिवळा केला । । बाशिंग बांधून नवरा केला ।। केळीच्या पानावर जेवायला वाढले । बोलता कसा… कुकुच कु… तोबा - गाणे - विठोबा, भला मारिला तोबा, कंबर मोडली ।। गज्जो ताक घुसळणे - एक जणाने डोक्यावर उपरणं घेऊन गौळण व्हायचं. हंडीच्या खाली एक काठी घेऊन ताक घुसळायची नक्कल करत, सर्वांनी त्याला हात देयचा. गाणे - घुसळण घातली सय्ये । आजून लोणी का नाहीये येत ।। सर्वजण: ए गौळणी, कुठलं ताक करतेस? गौळण: सासरचं. सर्वजण: आता माहेरचं कर. घुसळण घातली सय्ये । आजून लोणी का नाहीये येत ।। सर्वजण: ए गौळणी, कुठलं ताक करतेस? गौळण: माहेरचं. सर्वजण: आता शेजारचं कर. घुसळण घातली सय्ये । आजून लोणी का नाहीये येत ।। सर्वजण: ए गौळणी, कुठलं ताक करतेस? गौळण: शेजारचं. घुसळण घातली सय्ये । आजून लोणी का नाहीये येत ।। लोणी घेऊन येणे, व प्रत्येकाच्या नाकाला लावून आवाज करणे. हंडी फोडणे. वाघ-शेळी खेळणे. अंगणातील खेळ झाल्यावर सर्वांनी देवळाला प्रदक्षिणा घालणे. पेंद्या कुठे गेला विचारणा करणे. देवळाच्या मागे एक जण पेंद्या म्हणून एक पाय दुमडून पडून राहणे. सर्वांनी त्याला नाचवत पुढे आणणे. पेंद्याला देवळासमोर आणून खाली एक पाय दुमडूनच ठेवणे. सर्वांनी विचारणे, अशी दशा कशामुळे झाली? पेंद्याने सांगणे, डोळे उघडे ठेवल्यामुळे. परत चोरी न करण्यास सांगणे. गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला । कृष्णासाठी रे साठी, गोकुळात साखर वाटी । या गजरात सर्वांनी पेठेत फिरून, सोनार आळीच्या टोकापर्यंत जाऊन परत पाठी येणे. बेड्यात ठेवलेल्या घागरीतील पाणी अंगावर घेणे. नंतर नदीपर्यंत जाणे. विठोबा-शंकर मंदिराबाहेर आरती करणे. मग दहीकाला गोड झाला, पंढरीनाथ घरात आला। असा गजर करणे, मग घरी जाऊन अंघोळ करून मंदिरात येणे. गोपाळ कृष्णाची आरती करणे. अहो गोकुळीच्या सुखा हा अभंग म्हणणे - गोकुळीच्या सुखा । अंतपार नाही लेखा ।। बाळकृष्ण नंदा घरी । आनंदल्या नर नारी ।। गुढीया तोरणे । हरिकथा गाती गाणे ।। तुका म्हणे छंदे । मन मोहिले गोविंदे ।। राधा कृष्ण गोपाळ कृष्ण गजर करणे. प्रार्थना करणे. दहीपोह्याचा व सुंठवड्याचा प्रसाद घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करणे. इति. #dahihandi #dahikala #gopalkala #krishnajanmashtami #krishnajayanthi #janmashtami #utsav #gopalkrishan #दहीहंडी #गोपाळकाला #कृष्णजन्माष्टमी