Перейти к содержимому

संघ म्हणजे काय? संघाचे संघटन | भिक्खू कसा असावा? बुद्धाची धारणा | प्राचीन परिव्राजक #buddha

Mindof_Grey - Buddha Dhamma

0:00 / 0:00

संघ म्हणजे काय? संघाचे संघटन | भिक्खू कसा असावा? बुद्धाची धारणा | प्राचीन परिव्राजक #buddha

20 просмотров · 1 дн. назад
Mindof_Grey - Buddha Dhamma
44 подписчика
20 просмотров · 1 дн. назад
नमो बुद्धाय, जय भीम! 🙏 पाचवा खंड : संघ | भाग १ ते २ | पान ३१९-३३० पाचवा खंड : संघ भाग १ : संघ भाग २ : भिक्खू : बुद्धाची भिक्खू विषयीची धारणा भाग ३ : भिक्खूंची कर्तव्ये भाग ४ : भिक्खू आणि उपासक भाग ५ : उपासकांसाठी नियम १. संघ आणि संघाचे संघटन (P-319) १. तथागताचे अनुयायी दोन वर्गात विभाजित होते. भिक्खू आणि गृहस्थ. गृहस्थांना उपासक म्हणत असत. २. संघ हे भिक्खूंचे संघटन. उपासकांचे संघटन नव्हते. ३. बौद्ध भिक्खू हा प्रथम परिव्राजक आहे. परिव्राजक ही संस्था बौद्ध भिक्खूंपेक्षा प्राचीन आहे. ४. प्राचीन परिव्राजक म्हणजे गृहजीवनाचा त्याग करून इतस्ततः परिभ्रमण करणाराच तो समूह होता. ५. त्यांच्या परिभ्रमणाचा उद्देश मित्र मित्र आचार्य आणि दार्शनिक यांच्या भेटी घेणे, त्यांच्याशी चर्चा करणे आणि सत्याचा शोध घेणे हा होता. ते आचार्यांशी, दार्शनिकांशी नीती, दर्शन, प्रकृती, रहस्यवाद आदी विषयांवर चर्चा करीत. त्यांची प्रवचने श्रवण करीत असत. ६. काही प्राचीन परिव्राजक दुसरा गुरू मिळेपर्यंत एका गुरुजवळ राहत असत. तर दुसरे काही कोणालाही गुरु न मानता, गुरुशिवाय एकटेच राहत असत. ७. या प्राचीन परिव्राजकांत महिला परिव्राजकही होत्या. या महिला परिव्राजक कधी कधी पुरुष परिव्राजकांसह तर कधी कधी स्वतंत्रपणे राहत असत. ८. या प्राचीन परिव्राजकांचा संघ नव्हता. त्यांच्या आचरणाचे कोणीही नियम नव्हते. २. संघाचे नियम आणि अपराध स्वीकृती (P-320 to 325) संघात सुरुवातीला कोणतेही नियम नव्हते. परंतु नंतर जेव्हा अपराध वाढू लागले तेव्हा तथागताने नियम बनविले. तीच "अपराध स्वीकृती" संस्था होय. ही संस्था उपोसथ म्हणूनच ज्ञात होती. ८. भिक्खू आणि अपराध स्वीकृती (P-324) १. भिक्खू संघामध्ये जी सर्वाधिक मौलिक आणि अनुपम संस्था अथवा प्रथा तथागताने प्रस्थापित केली ती म्हणजे अपराध स्वीकृतीची संस्था होय. ही संस्था उपोसथ म्हणूनच ज्ञात होती. ५. या समिती भिक्खू क्रमाक्रमाने प्रतिमोक्षाच्या नियमांचे पठन करीत असे. पठनानंतर तो एकत्रित भिक्खूंना विचारणा करीत असे की, आपण मौन आहात याचा अर्थ आपणांपैकी कोणीही या प्रतिबंधाचे उल्लंघन केले नाही. असे मी मानतो, तो हे तीन वेळा उच्चारित असे. त्यानंतर तो पुढच्या प्रतिमोक्षाकडे वळत असे. ७. भिक्खूंची संघी अशी सभा आयोजित करीत असत. भाग २ : भिक्खू : बुद्धाची भिक्खू विषयीची धारणा १. भिक्खू कसा असावा : बुद्धाची धारणा (P-325) १. भिक्खू कसा असावा याविषयी आपली काय धारणा आहे हे बुद्धानेच स्वतः भिक्खूंना कथन केले आहे. ते असे म्हणाले की, २. "जो कोणी पाप शुद्धी केल्याशिवाय आणि सत्य आणि संयम यांचा आदर न करता काषाय वस्त्रे धारण करीत असेल तर तो ती वस्त्रे धारण करण्यास पात्र नाही." ३. "परंतु ज्याने स्वतः पापापासून मुक्त केले आहे, ज्याच्या ठायी सत्यगुण वास करतात, जो जीवनाचा त्याग आणि संयम यांचे आचरण करतो तोच खऱ्या अर्थाने काषाय वस्त्रे धारण करण्यास पात्र आहे." ४. "इतरांना शिक्षा मागतो एवढ्याच कारणास्तव कोणी भिक्खू होत नाही. जो धम्माला सम्यक समग्र दृष्टीने स्वीकारतो. जो धम्माचे आचरण करतो तोच भिक्खू होय. फक्त भिक्षेकरी म्हणजे भिक्खू नव्हे." ५. "जो पाप कर्मापासून मुक्त आहे. जो अव्यभिचारी आहे, जो सावधान चित्ताने इहलोकी विचरण करतो. तोच खऱ्या अर्थाने भिक्खू जाणावा." ७. "जो भिक्खू वाणीचा संयम पाळतो, जो सुज्ञपणे आणि शांतपणे बोलतो, जो धम्माचा अर्थ स्पष्ट करून सांगतो, त्याची वाणी मधुर असते." ८. "जो धम्मात रममाण आहे, जो धम्मात आनंद मानतो, जो धम्मात समाधिक असतो, जो धम्माचरण करतो तो भिक्खू सद्धम्मापासून कधीही परिहृत होणार नाही, विचलित होणार नाही." ९. "जो आपणास लाभले त्याची अवहेलना करत नसे, जे दुसऱ्यास लाभले त्याची ईर्षा करीत नसे, जो भिक्खू दुसऱ्याविषयी ईर्षा बाळगतो, त्याला कधीही शांती लाभत नाही." १०. "जो भिक्खू ज्याला कितीही अल्प लाभ होवो, तो त्याची अवहेलना करीत नाही, जर त्याचे जीवन पवित्र असेल, अप्रमादित असेल तर, त्याची देवही प्रशंसा करतील." ११. "जो आपल्या नामरूपाविषयी आसक्त नाही, जे त्याच्याजवळ नाही त्यामुळे तो दुःखी होत नाही, तोच खरा भिक्खू जाणावा." ३. भिक्खू आणि तपस्वी (P-330) - तपश्चर्येचे दोष तथागत निग्रोधाला तपस्व्याचे २२-२९ दोष सांगतात: २२. तपस्वी देणग्यांची, यशाची, कीर्तीची कामना करतो. तेव्हा तो विचार करतो की, राजा मला मान देईल. म्हणून राजाचे अधिकारी, अमात्य माझा सन्मान करतील. त्याप्रमाणे ब्राह्मण क्षत्रिय गृहस्थ आणि मोठमोठे आचार्य माझ्याकडे आकर्षित होतील. माझा सन्मान करतील. हाही या तपश्चर्येचा दोष आहे. २३. हा तपस्वी दुसऱ्या संन्याशी अथवा ब्राह्मणाविषयी कुरकूर करतो आणि म्हणतो हा संन्यासी, हा ब्राह्मण सर्वप्रकारचे अन्न ग्रहण करतो. हा कंदमुळे, फळे, धान्य, शाक, बीज आदी आपल्या जबड्यांनी जबड्यासारखे भरडून खातो. तरीसुद्धा लोक याला पवित्र मानतात. या तपश्चर्येचा दोष आहे. २७. हा तपस्वी ढोंगी आणि वंचक होऊ शकतो. तो द्वेष करणारा, कुरकूर करणारा होऊ शकतो. तो धूर्त आणि लोभी होऊ शकतो. तो कठोर हृदयाचा आणि व्यभिचारी होऊ शकतो. त्याच्या चित्तात दुष्ट भावना वास करू शकतात. तो या भावनांचा दास होऊ शकतो. तो मिथ्या धारणा राखू शकतो, तो पराप्रकृतिक शक्ती आणि सिद्धींवर श्रद्धा ठेवतो. तो आपल्या अनुभवाची चुकीची व्याख्या करतो. तो लोभग्रस्त होतो. तो वैराग्य पराङ्मुख होतो. हाही तपश्चर्येचा दोष आहे. जय भीम, नमो बुद्धाय! @mindof_grey | Buddha Vani