सुखी गृहस्थाचे 4 सुख | पुत्रीपेक्षा पुत्री श्रेष्ठ? | अनाथपिंडकाला बुद्धाचा उपदेश #buddha #ancient
Mindof_Grey - Buddha Dhamma
0:00 / 0:00
सुखी गृहस्थाचे 4 सुख | पुत्रीपेक्षा पुत्री श्रेष्ठ? | अनाथपिंडकाला बुद्धाचा उपदेश #buddha #ancient
108 просмотров · 2 дн. назад
Mindof_Grey - Buddha Dhamma
44 подписчика
108 просмотров · 2 дн. назад
नमो बुद्धाय, जय भीम! 🙏
चतुर्थ खंड : भाग-४ | ४:४:(I) १-२-३ | ४:४:(II) १-२-३
भाग ४ : त्यांची प्रवचने
I : प्रवचने
१. सुखी गृहस्थ (Page 290)
एकदा तथागत जेथे वास्तव्याला होते तेथे अनाथपिंडक आला. त्याने तथागतांना वंदन केले आणि गृहस्थाचे सुख कशात आहे हे जाणून घेण्यासाठी आतुर होता.
तथागत म्हणाले - "गृहस्थाचे ४ सुख आहेत"
१) स्वामित्व सुख - गृहस्थ धनधान्य संपन्न असतो. ही धनसंपदा त्याने न्यायाच्या मार्गाने, धम्माच्या मार्गाने, घोर परिश्रमाने संपादन केलेली असते. ही धनसंपदा त्याने बाहुबलाने, निढळाच्या घामाने संपादन केलेली असते. आणि तो जेव्हा विचार करतो की, "मी ही धनसंपदा न्याय्य मार्गाने अर्जित केली आहे" तेव्हा त्याला सुख प्राप्त होते.
२) उपभोगाचे सुख - गृहस्थ धनधान्य संपन्न आहे. त्याने न्याय्य मार्गाने, धम्म मार्गाने, कठोर परिश्रमाने ही धनसंपदा संपादित केली आहे. तो धनसंपदा उपभोगतो आणि पुण्य कर्म करतो. तो मनी विचार करतो की, "मी न्याय्य मार्गाने संपादित या धनसंपदेचा उपयोग पुण्यकर्म करण्यासाठी करतो" तेव्हा त्याला सुख प्राप्त होते.
३) ऋण नसण्याचे सुख - जो गृहस्थ कोणाचीही लहान मोठे ऋण देणे लागत नाही त्याला सुख प्राप्त होते. तो असा विचार करतो की, "मी कोणाचेही देणे लागत नाही" आणि त्याला सुख प्राप्त होते.
४) निष्कलंक असण्याचे सुख - जो गृहस्थ काया, वाचा आणि मनाने निष्कलंक असतो, त्याला निष्कलंक असल्याचे, दोष रहित असल्याचे सुख प्राप्त होते.
जर गृहस्थ निरंतर प्रयासरत असेल तर खरेच त्याला या चार सुखांची प्राप्ती होऊ शकते.
२. पुत्रापेक्षा पुत्री अधिक योग्य असू शकते (Page 291)
एकदा तथागत श्रावस्ती येथे वास्तव्याला असताना, कोशल नरेश प्रसेनजीत तेथे तथागताच्या भेटीसाठी आला. वार्तालाप करीत असताना त्याच समयी राजप्रासादातून एक दूत आला. त्याने येऊन राजाला राणी मल्लिका हिने एका पुत्रीला जन्म दिला आहे ही वार्ता गुप्तपणे कथन केली.
या वार्तेने राजा दुःखी झाला. खिन्न झाला. तथागताने राजाला त्याच्या दुःखाचे, खिन्नतेचे कारण विचारले. राजा उत्तरला, "राणी मल्लिकाने पुत्रीला जन्म दिला, ही दुःखद वार्ता आताच मला समजली."
तेव्हा तथागताने या विषयाचा उहापोह करताना कथन केले की, "हे पुत्रापेक्षा पुत्री अधिक योग्य असू शकते"
मानवातील श्रेष्ठ राजा, कन्याच कदाचित पुत्रापेक्षा श्रेष्ठ सिद्ध होऊ शकेल. ती सुशील असू शकेल. ती आपल्या पतीच्या, मातापित्याच्या आदरास प्राप्त होईल. ती योग्य भार्या म्हणून पतीच्या आदरास प्राप्त होईल, सुयोग्य पुत्री म्हणून पतीच्या मातापित्याच्या आदरास पात्र होईल. महान कर्म करणारा, मोठा राज्याचा शासक होऊ शकेल. अशा श्रेष्ठ मातेचा पुत्र या देशाचा मार्गदर्शक होऊ शकेल, शास्ता होऊ शकेल.
३. पती आणि भार्या (Page 292)
एकदा तथागत मथुरा आणि वेरंजा यांना जोडणाऱ्या महामार्गाने मार्गक्रमण करीत होते. त्या महामार्गावर तथागतासह मोठ्या संख्येने गृहस्थ आणि त्यांच्या भार्यासुद्धा मार्गक्रमण करीत होत्या. तेव्हा तथागताने महामार्ग सोडून एका वृक्षाखाली आसन ग्रहण केले. त्या गृहस्थांनी आणि त्यांच्या भार्यांनी तथागताला वृक्षाखाली आसनस्थ पाहिले. ते सर्व तथागत आसनस्थ होते तेथे त्यांच्या निकट गेले व त्यांनी तथागताला वंदन केले. त्यांनी तथागतानिकट आसन ग्रहण केले आणि तथागताने पती आणि भार्या यांच्यातील परस्पर संबंधाची व्याख्या करावी अशी प्रार्थना केली.
४ प्रकारचे सहजीवन :
१) दुष्ट पुरुष आणि दुष्ट स्त्री दोघेही सहजीवन जगतात
२) दुष्ट पुरुष आणि देवतासम स्त्री सहजीवन जगतात
३) देवतासम पुरुष आणि दुष्ट स्त्री सहजीवन जगतात
४) देवतासम पुरुष आणि देवतासम स्त्री सहजीवन जगतात - हेच उत्तम जीवन होय!
II : शील परिशीलनाची आवश्यकता प्रतिपादित करणारी प्रवचने
१. माणसाचे अधःपतन का होते? (Page 293)
एकदा तथागत श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनारामात वास्तव्याला होते. एके दिवशी उत्तर रात्री एक देव आपल्या दीप्तीने जेतवनाचा सारा आश्रम आलोकित करीत तथागताकडे आला. तो तथागतानिकट आला, आदराने त्याने तथागताला वंदन केले. तो एका बाजूला उभा राहिला. तो तथागताला उद्देशून म्हणाला,
"तथागता, मी आलेल्या समक्ष शंका निरसनासाठी उपस्थित आहे. हे श्रवण गौतमा, मी माणसाच्या अधःपतनाविषयी जाणून घेऊ इच्छितो. कृपया मला माणसाच्या अधःपतनाची कारणे स्पष्ट करावी."
तथागताने माणसाच्या अधःपतनाची १५ कारणे सांगण्याचे मान्य केले :
जो धम्मावर प्रेम करत नाही, जो धम्मप्रवण नाही तो उन्नतीमुख आहे, जो धम्माचा द्वेष करतो, जो अधम्म मार्गाचा अनुयायी आहे तो पतनोन्मुख जाणावा.
ज्याला असत्पुरुष प्रिय आहेत, ज्याला सत्पुरुष प्रिय नाहीत, त्याला पतनोन्मुख जाणावे.
जो निद्रालु आहे, जो गप्पागोष्टीत रमणारा आहे, जो उत्साही नाही, जो आळसात रमणारा आहे, जो क्रोधी आहे तो पतनोन्मुख जाणावा.
जो माणूस असंग, उधळ्या स्वभावाचा आहे, जो आपले धन ऐषारामात उधळतो तो पतनोन्मुख जाणावा हे त्याच्या पतनाचे दहावे कारण होय.
जो क्षत्रिय अल्पसाधने, अल्पक्षमता असूनही मोठा महत्वाकांक्षी आहे, राजा होण्याची त्याची आकांक्षा आहे तो माणूस पतनोन्मुख जाणावा.
३. श्रेष्ठतम माणूस (Page 294-295)
चारिका करीत असताना नेहमीच्या परिपाटीप्रमाणे तथागताने त्यांच्यासमवेत असलेल्या भिक्खूंना अशी देशना दिली :
"हे भिक्खूंनो, या इहलोकी तुम्हाला चार प्रकारची माणसे आढळतील"
जो आपल्या हिताचे मोल देऊन इतरांच्या कल्याणाचे प्रयास करतो तो या दोन्हीत अलौकिक आहे, अति उत्तम आहे."
"आणि पुन्हा हे भिक्खूंनो, जो स्वतःच्या कल्याणासाठी आणि इतरांच्याही कल्याणासाठी प्रयत्नरत आहे असा माणूस या चारही वर्गात सर्वोत्तम आहे, अलौकिक आहे, सर्वश्रेष्ठ आहे, अत्युच्च आहे, परम आहे."
हाच आहे सुखी गृहस्थाचा मार्ग!
जय भीम, नमो बुद्धाय!
Mindof Grey | Buddha Vani