Free उकडीचे मोदक Workshop | Ukadiche modak marathi | #ukadichemodak ft Madhuri Nakate
Food Kutumba
0:00 / 0:00
Free उकडीचे मोदक Workshop | Ukadiche modak marathi | #ukadichemodak ft Madhuri Nakate
1 074 просмотра · 11 дней назад
Food Kutumba
6,71 тыс. подписчиков
1 074 просмотра · 11 дней назад
#ukadichemodak #ganeshchaturthi
माधुरी नकाते , पुणे , यांच्याकडून उकडीचे मोदक Order करण्यासाठी तसेच शिकण्यासाठी या 9168757272 क्रमांकावर संपर्क साधावा !
साहित्य (Ingredients):
उकडीसाठी:
तांदळाचे पीठ / पिठी - १ वाटी
पाणी - १ वाटी
मीठ - १ लहान चमचा (चवीनुसार)
साजूक तूप - १ लहान चमचा
सारणासाठी:
ओले खोबरे (खवलेले) - २ वाट्या
गूळ - १ वाटी
पाणी - १ मोठा चमचा (गूळ वितळवण्यासाठी)
जायफळ पूड - चवीनुसार
वेलची पूड - चवीनुसार
खसखस (भाजलेली) - अंदाजाने
साजूक तूप - १ लहान चमचा
इतर:
सजवण्यासाठी केशरच्या काड्या
हाताला आणि पिठाला लावण्यासाठी तूप आणि पाण्याचे मिश्रण
कृती (Method):
१. तांदळाची उकड काढणे:
एका पातेल्यात १ वाटी पाणी गरम करायला ठेवा. त्यात १ लहान चमचा मीठ आणि १ लहान चमचा तूप घाला.
पाण्याला छान उकळी आल्यावर गॅस बारीक करा आणि १ वाटी तांदळाची पिठी त्यात घाला.
पिठीमध्ये गाठी होणार नाहीत अशा प्रकारे ती पाण्यात त्वरित हलवून (ढवळून) घ्या.
गॅस बंद करून पातेल्यावर झाकण ठेवा आणि १० मिनिटे उकड वाफेवर राहू द्या.
२. सारण तयार करणे:
कढईमध्ये १ वाटी गूळ आणि १ मोठा चमचा पाणी घालून गूळ मंद आचेवर वितळून घ्या.
गूळ वितळल्यावर त्यात २ वाट्या खवलेले ओले खोबरे घाला व नीट एकजीव करा.
खोबरे गुळात व्यवस्थित शिजून त्याला सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत ढवळत राहा.
सारण छान शिजल्यावर शेवटी १ चमचा तूप, वेलची पूड, जायफळ पूड आणि भाजलेली खसखस घालून एकत्र करा व गॅस बंद करा.
३. मोदक वळणे व उकडणे:
उकडलेले तांदळाचे पीठ कोमट असतानाच मऊ मळून घ्या आणि पिठाचे एकसारखे गोळे तयार करा.
सारणाचेही लहान लहान गोळे बनवून ठेवा.
हाताला किंवा पुरी प्रेसरवर तूप-पाण्याचा हात लावून पिठाच्या गोळ्याची बारीक व गोल पारी तयार करा.
पारीच्या कडांवर हाताच्या बोटांनी छान कळ्या (पाकळ्या) पाडून घ्या.
आता कळ्यांच्या मध्ये सारणाचा गोळा ठेवा आणि सर्व कळ्या हळूवार एकत्र आणून वरच्या बाजूने बंद करत मोदकाचे टोक काढा.
मोदकाच्या टोकावर केशरची काडी लावून मोदक सजवा.
तयार मोदक स्टीमर किंवा उकडण्याच्या चाळणीत ठेवून छान उकडून घ्या.