Перейти к содержимому

Bol Bhidu Diwali Ank 2026 | कारण राजकारण | Anant Bagaitkar सांगतायत भारतीय राजकारणाचं बदलतं स्वरुप

BolBhidu

0:00 / 0:00

Bol Bhidu Diwali Ank 2026 | कारण राजकारण | Anant Bagaitkar सांगतायत भारतीय राजकारणाचं बदलतं स्वरुप

68 просмотров · 25 мин. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
68 просмотров · 25 мин. назад
#BolBhidu #DigitalDiwaliAnk2026 #AnantBagaitkar तर भिडू, मराठी माणूस आणि दिवाळी अंक हे पूर्वीपासूनच अगदी जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालंय. दिवाळीत छापील अंक घेऊन वाचण्याचा आनंद हा काही निराळाच असतो. पण काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं तसं वाचनाची जागा व्हिडिओनं म्हणजे बघण्या-ऐकण्यानं घेतलीय. म्हणूनच 'बोल भिडू' यंदा दिवाळी अंकांच्या इतिहासात एक नवा आणि क्रांतिकारी प्रयोग घेऊन आलंय. तो म्हणजे 'बोल भिडू' डिजिटल दिवाळी अंक'... यात मान्यवरांच्या आठवणी, राजकीय विश्लेषण, कविता, कथाकथन, रिपोर्ताज असं सगळं काही व्हिडिओ स्वरूपात आपल्या 'बोल भिडू'च्या यूट्यूब चॅनेलवर असणार आहे. अर्थात यंदाच्या दिवाळीत मान्यवर साहित्यिक, लेखक, कवी, राजकीय अभ्यासक, विचारवंत, पत्रकार आणि नेते यांचे मौलिक विचार थेट स्क्रीनवर घेऊन आलो आहोत. डिजिटल माध्यमविश्वात बदल घडवू पाहणाऱ्या या पहिल्यावहिल्या डिजिटल दिवाळी अंकातून मान्यवरांच्या विचारांची जादू जगभरातल्या प्रेक्षकांना अनुभवता यावी, अशी आमची मनापासून इच्छा आहे. म्हणूनच आपण हा निखळ अनुभव घ्यावा आणि आपली दिवाळी द्विगुणित व्हावी, याच शुभेच्छा ! ज्येष्ठ राजकीय पत्रकार अनंत बागाईतकर यांनी ४० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं आहे. ते विशेषतः दिल्लीतील राजकीय घडामोडी आणि संसदेच्या वार्तांकनासाठी ओळखले जातात. या दिवाळी अंकातील 'कारण राजकारण' या विभागात त्यांनी 'भारतीय राजकारणाचं बदलतं स्वरूप' (१९८५ ते २०२६) मांडलंय. 'बोल भिडू' हे मराठी डिजिटल मीडियातलं गेली सात-आठ वर्षांपासून एक आघाडीचं माध्यम ठरलंय. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या घडामोडींची साध्या-सोप्या भाषेत, पण तितक्याच परखड रांगड्या शैलीत सखोल माहिती देणारं यूट्यूब चॅनेल अशी 'बोल भिडू'ची ठळक ओळख निर्माण झालीय. जगभरातल्या गोतावळ्याच्या पाठिंब्यावर आतापर्यंत चॅनेलनं जवळपास ३० लाख सबस्क्रायबरचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठलाय. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/