Перейти к содержимому

सावळ्या हरी | Sawalya Hari

स्वरदर्पण

0:00 / 0:00

सावळ्या हरी | Sawalya Hari

57 668 просмотров · 3 г. назад
स्वरदर्पण
28,4 тыс. подписчиков
57 668 просмотров · 3 г. назад
गाण्याचे बोल: सावळ्या हरी ऐकू द्या तरी सावळ्या हरी ऐकू द्या तरी काय झालं रुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला || धृ || रखुमाई म्हणते फुगवून गाल भक्तांच्या तालावर ह्यांचा हो ताल काय ठेवलंय या भक्तांच्या घरी ऊठसूठ घुसायला.. अगंबाई ऊठसूठ घुसायला || १ || ही कोण मेली जनी का बनी तिची कशी केली वेणी फणी दळण कांडण करुनी गेला लुगडी धुवायला.. बाई बाई लुगडी धुवायला || २ || तो कोण मेला तुकोबा वाणी त्याने कशी लिहिली चार दोन गाणी तेवढ्यासाठी का विमान धाडायचं फुक्कट बसायला.. हो का फुक्कट बसायला || ३ || आणखी एक तो सावता माळी त्याची मोट ही ह्याने घेतली मळ्याची केली फुक्कट बागायत बसला राखायला.. अरे वा बसला राखायला || ४ || नाम्याचं कीर्तन गेला ऐकायला अंगात आल्यावाणी लागला नाचायला बरं झालं तिकडे कबीर होता सावध करायला.. बरं का सावध करायला || ५ || तुझा नि माझा करुनी धावा असा काय करतेस त्यांच्याशी कावा भक्तीच्या दोरीने याला बांधावा आपलंसं करायला.. हो हो आपलंसं करायला || ६ || रखुमाई उठली गालात हसली चला जाऊ पाहायला ||