Перейти к содержимому

Konkan मधला Khavis म्हणजे डेंजर विषय...पण हा खविस आला कुठून ? आफ्रिकेतून आला ? खविसची सगळी गोष्ट...

BolBhidu

0:00 / 0:00

Konkan मधला Khavis म्हणजे डेंजर विषय...पण हा खविस आला कुठून ? आफ्रिकेतून आला ? खविसची सगळी गोष्ट...

245 018 просмотров · 2 года назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
245 018 просмотров · 2 года назад
#BolBhidu #KhavisBhoot #Konkan मागच्या पावसाळ्यातली गोष्ट आहे, आम्ही पोरं पोरं कोकणात गेलो होतो. आता पावसाळ्यात कोकण म्हणजे खुंखार पाऊस, ना आंबे, ना उन्हाची उब, पण तरीही भारी विषय. घराच्या अंगणात निवांत बसावं आणि पावसाचा नुसता आवाज ऐकावा, स्टीलच्या पेल्यातून चाय प्यावी, सकाळी चाय पोहे खावे, दुपारी आंबोळी, रात्री कुळथाचं पिठलं खावं, परत अंगणात येऊन पाऊस ऐकावा आणि त्याच्या सोबत कुणीतरी भुताच्या गोष्टी सांगाव्या. या भुताच्या गोष्टी कुठून पण सुरु होऊ शकतात, म्हणजे भुताशी कुस्ती खेळून आलो, भुतानं गायछाप मागितली, भुतानं ओढूनच नेलं. या गोष्टींपेक्षा एक भारी विषय असतो... या भूतांपासून वाचायचं कसं. भूत बदललं की वाचायची ट्रिक बदलते पण लय लोड आला तर वेतोबाला आठव, तो रक्षण करतोय हे कॉमन असतंय. पण ही भुतं फक्त गप्पांमधून येत नाहीत, प्रत्येक भुताला गोष्ट असते आणि इतिहासही. मुंजाची स्टोरी सांगताना लोकं म्हणतात, पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ नको, सातीआसरांची स्टोरी सांगताना म्हणतात विहिरीत डोकावून पाहून नको, समंध असतोय म्हणून जुन्या झाडाजवळ जाऊ नको आणि खविस असल म्हणून समुद्राजवळ. आता आजवर खविस म्हणलं की आपली मजल लईत लई कुबड्या खविसपर्यंत जायची, पण कोकणातला खविस म्हणजे डेंजर विषय असतोय. कुणी म्हणतंय खविस उतरवणं लई अवघड असतंय, कुणी म्हणतंय हा खवीस आफ्रिकेतून आलाय. आजवर माणसांचं स्थलांतर ऐकलं होतं, भूत फॉरेनवरनं आलंय म्हणल्यावर विषय संशोधनाचा वाटला, खरं सांगायचं तर थोडा भीतीचाही. पण आता आपल्यासाठी भूत भूत असतंय, कुठलं का असना, म्हणून त्याची गोष्ट शोधली. अगदी जुनी. खविस या भुताच्या भीतीची, त्याच्या इतिहासाची आणि लोककथांचीही. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/