रामरक्षा प्रवचन - 6 | ‘आजानुबाहु’ रामाचे ध्यान कसे कराल? रामरक्षेची फलश्रुती काय? | Aniruddha Bapu
Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)
0:00 / 0:00
रामरक्षा प्रवचन - 6 | ‘आजानुबाहु’ रामाचे ध्यान कसे कराल? रामरक्षेची फलश्रुती काय? | Aniruddha Bapu
34 092 просмотра · 1 год назад
Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)
346 тыс. подписчиков
34 092 просмотра · 1 год назад
‘रामरक्षा’ ह्या सर्वांगसुंदर स्तोत्रमंत्राच्या एकेका अर्थगर्भ पंक्तीची तितक्याच सुंदरपणे उकल करत सद्गुरु बापू पुढे-पुढे चालले आहेत.
‘श्रीमद्हनुमान कीलकम्।’ ही रामरक्षेतील पंक्ती सखोलपणे समजावल्यावर, सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी ०२ डिसेंबर २००४ रोजीचे पुढील प्रवचन खालील पंक्तींवर केले:
‘श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोग:।
अथ ध्यानम् ।
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं’
कुठलेही स्तोत्र वाचताना माणसाच्या मनात विचार येतो - ‘मी ह्याचा विनियोग कसा करायचा? ह्याचा मला फायदा काय?’ - मग तो फायदा आध्यात्मिक असेल किंवा व्यावहारिक. पण ह्या दिव्य अशा रामरक्षा स्तोत्रमंत्राबद्दल बोलताना बापूंनी, त्याचा ‘विनियोग’ किती अनोखा आहे व त्या भावनेने हे स्तोत्रमंत्र वाचल्यास पठणकर्त्याला किती श्रेष्ठ दर्जाचा फायदा होऊ शकतो, हे आपल्याला इथे सांगितले आहे.
तसेच कुठलेही पवित्र स्तोत्र फळण्याकरिता त्यातील आराध्यदेवतेचे ध्यान व्यवस्थित होणे महत्त्वाचे असते. रामरक्षेची आराध्यदेवता अर्थातच ‘प्रभू श्रीरामचंद्र’. तर ह्या स्तोत्रमंत्रापासून सर्वाधिक फायदा मिळण्यासाठी ‘धृतशरधनुष’ ‘बद्धपद्मासनस्थ’ अशा रामाचे ध्यान कसे केले पाहिजे, त्यासंबंधी विवेचन बापू इथे करतात.
ह्याच ध्यानाच्या अनुषंगाने अजून एक शब्द येतो - ‘आजानुबाहु’. आम्ही ऐकतो की प्रभु श्रीराम ‘आजानुबाहु’ होते. अनेकांना प्रश्न पडतो की हे कसे शक्य आहे? इथे बापू आम्हाला - ‘आजानुबाहु’ म्हणजे काय हे स्पष्ट करताना, ह्या संकल्पनेचा आधी साधा, सरळ अर्थ ‘शरीररचनाशास्त्रा’च्या - ‘ऍनॅटॉमी’च्या आधाराने समजावून सांगतात व नंतर त्याचा वास्तविक सखोल आध्यात्मिक अर्थ काय आहे, तेदेखील उलगडून दाखवतात.
शेवटी एक गंमतीशीर, पण समर्पक उदाहरण बापू देतात, ते म्हणजे महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय अशा ‘श्रीखंड’ ह्या गोड पक्वान्नाचे. आता ह्या सगळ्या भक्तिप्रवासाचा, ‘श्रीखंडा’शी काय संबंध असू शकेल? पण प्रवचनाच्या शेवटी सद्गुरु बापू ह्या श्रीखंडाच्या उदाहरणामधून मानवी जीवनाचे रहस्य आम्हाला उलगडून सांगतात.
Previous Ramraksha Pravachan - • रामरक्षा प्रवचन-5 |‘कीलक’ म्हणजे नक्की काय...
Next Ramraksha Pravachan - • रामरक्षा प्रवचन-7 |धृतशरधनुषं:‘रामबाण’ म्ह...
#aniruddhabapu #ramraksha #rammantra #shreeram
©℗
----------------------------------
Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c...
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com
Watch live events - https://www.aniruddha.tv
Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
----------------------------------