Chakra Alignment for Money & Success - Part 1
QUANTUM AWAKENING
0:00 / 0:00
Chakra Alignment for Money & Success - Part 1
11 504 просмотра · 2 мес. назад
QUANTUM AWAKENING
62,6 тыс. подписчиков
11 504 просмотра · 2 мес. назад
For booking - 9730977799 or 9923644664
मित्रांनो,
गेल्या वीस वर्षांपासून आपण चक्रांवर काम करत आलो आहोत.
या काळात आपण चक्रांकडे
ध्यान, आरोग्य, भावनिक संतुलन आणि अंतर्गत जागृती
या विविध अंगांनी पाहिलं आहे.
पण यावेळी प्रथमच
आपण चक्रांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत.
पैसा.
वाढ.
आर्थिक स्थैर्य.
यश.
आणि जीवनात हे सर्व साध्य करण्याची
आपली अंतर्गत क्षमता.
पैसा ही केवळ बाहेरची गोष्ट नाही.
पैसा कमावण्याची,
तो स्वीकारण्याची,
तो टिकवण्याची,
त्याचा विस्तार करण्याची
आणि त्याचा योग्य उपयोग करण्याची
आपली क्षमता आपल्या अंतर्गत कार्यप्रणालीशी जोडलेली असते.
चक्रं स्वतः सकारात्मक किंवा नकारात्मक नसतात.
पण एखाद्या चक्राशी संबंधित क्षमता
भीती, असुरक्षितता, अपराधभाव, गोंधळ,
आत्मनकार किंवा ताणामुळे संकुचित झाली...
तर ती पैसा, वाढ आणि यशाच्या प्रवाहात
अडथळा निर्माण करू शकते.
आणि तीच क्षमता
स्थिर, मोकळी आणि सुसंगत झाली...
तर ती आपल्या प्रवासाला
आधार देऊ शकते.
या सर्व क्षमतांचा
पैसा आणि यशाशी नेमका कसा संबंध आहे?
आपल्या चक्रांपैकी
कोणती चक्रं या प्रवाहाशी सहकार्य करत आहेत?
कोणत्या चक्रांमध्ये आकुंचन,
अडथळा किंवा विसंवाद आहे?
आणि त्याचा आपल्या जीवनातील
निर्णय, कृती, संबंध, संवाद आणि आर्थिक अनुभवांवर
कसा परिणाम होत आहे?
हे आपण या विशेष इंट्रो सेशनमध्ये पाहणार आहोत.
या सत्रात तुम्हाला
एक Self-Assessment Questionnaire दिली जाईल.
तिच्या मदतीने
पैसा आणि यशाशी संबंधित
तुमची अंतर्गत कार्यप्रणाली तुम्हाला
जाणीवपूर्वक पाहता येईल.
ही प्रश्नावली फक्त आपली चक्रस्थिती
नाही.
ती तुम्हाला कोणताही ठप्पा देण्यासाठी नाही.
तर तुमच्या organism मधील
कोणती क्षमता सध्या ताणामुळे संकुचित होते आहे
आणि कोणती क्षमता
तुमच्या वाढीला सहकार्य करते आहे,
हे पाहण्यासाठी आहे.
गेल्या वीस वर्षांच्या अनुभवात आम्ही
चक्रांवर अनेक पद्धतींनी काम केलं आहे.
पण पैसा, आर्थिक वाढ आणि यश
या दृष्टिकोनातून चक्रांकडे पाहण्याचा
हा आमचा पहिला उपक्रम आहे.
ही एक सात दिवसांची
ऑनलाइन कार्यशाळा असेल.
दररोज एक तास.
ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून.
या कार्यशाळेची सविस्तर माहिती
आणि बुकिंगची प्रक्रिया
२६ जुलैच्या परिचय सत्रात जाहीर केली जाईल.
परिचय सत्र सर्वांसाठी विनामूल्य आहे.
त्यासाठी पूर्वनोंदणीची गरज नाही.
इंट्रो लेक्चर चे ठिकाण आणि वेळ:
सायंकाळी ६ वाजता
मुंबई
२ ऑगस्ट
सायंकाळी ६ वाजता
B. N. Vaidya Hall,
Raja Shivaji Vidya Sankul Campus,
Hindu Colony, Dadar East, Mumbai
पैसा आणि यशाकडे
फक्त बाह्य संधींच्या दृष्टीने पाहण्यापेक्षा...
आपल्या अंतर्गत व्यवस्थेतील
कोणती क्षमता या प्रवाहाला अडथळा आणते आहे
आणि कोणती क्षमता
त्याला आधार देते आहे...
हे पाहण्याची ही एक नवी सुरुवात आहे.
सर्वांचं स्वागत आहे.