Перейти к содержимому

१६८.सत्र ४ - मांडुक्य उप - मंत्र ७ - का ७ ते १० - तुरीय आत्मतत्त्वाची ओळख -आ.प्रदीपदादा लघाटे

Shivgad Pariwar

0:00 / 0:00

१६८.सत्र ४ - मांडुक्य उप - मंत्र ७ - का ७ ते १० - तुरीय आत्मतत्त्वाची ओळख -आ.प्रदीपदादा लघाटे

549 просмотров · 1 мес. назад
Shivgad Pariwar
5,44 тыс. подписчиков
549 просмотров · 1 мес. назад
अभ्यास वर्ग क्रमांक १६८ = मांडुक्य उपनिषद. सत्र ४ - विषय : मांडुक्य उपनिषद - मंत्र ७ - कारिका ७ ते १० - तुरीय आत्मतत्त्वाची ओळख निरूपणकार - आ.श्री.प्रदीपदादा लघाटे दिनांक - २५ ऑगस्ट २०२६ आयोजक - शिवगड अध्यात्म चॅरीटेबल ट्रस्ट. स्थळ - शिवगड श्रीकृष्णनगरी, मुरगुड. शिवगड अध्यात्म चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे २४ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२६ रोजी आद्य शंकराचार्य विरचित मांडुक्य उपनिषद या विषयावर श्रीकृष्ण नगरी शिवगड येथे सद्गुरू डॉ श्रीकृष्ण देशमुख उपाख्य डॉ काकांच्या आशीर्वादाने १६८ वा अभ्यासवर्ग संपन्न झाला. परमार्थाचा अभ्यास करणाऱ्या साधकांना साधना करताना तसेच अभ्यास करताना अनेक प्रश्न, शंका मनात असतात. त्या शंकांचे योग्य निरसन झाल्यास साधनेला चांगली दिशा आणि गती मिळू शकते या विचारांनी हा अभ्यास वर्ग आयोजित केला गेला. मांडुक्य उपनिषदाच्या अभ्यासातील पुढचा टप्पा म्हणजे मंत्र ७ = तुरीय आत्मतत्त्वाची ओळख मांडुक्य उपनिषदातील मंत्र ७ हा संपूर्ण उपनिषदाचा अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांचा अनुभव घेतल्यानंतर प्रश्न उभा राहतो—या तिन्ही अवस्थांपेक्षा वेगळे असे आत्मतत्त्व कोणते? या प्रवचनात तुरीय आत्मा या संकल्पनेचा विचार करण्यात आला आहे. जो जागृत नाही, स्वप्न नाही, सुषुप्तीही नाही; जो अंतर्मुख किंवा बहिर्मुख अनुभवांच्या पलीकडे आहे—अशा आत्मस्वरूपाचे निर्देश मांडुक्य उपनिषद करते. आपण अनुभवत असलेल्या अवस्थांमध्ये बदल होत असतात; परंतु त्या बदलांना जाणणारे आत्मतत्त्व मात्र नित्य आहे. या दृष्टिकोनातून अद्वैत सत्याची ओळख या प्रवचनातून करून दिली आहे. मांडुक्य उपनिषदाच्या अभ्यासातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा—तीन अवस्थांपासून तुरीय आत्मस्वरूपाकडे नेणारा - आ.श्री. प्रदीपदादा लघाटे ह्यांनी खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले. अनेक अभ्यासू साधकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि आपल्या अनेक शंकांचे निरसन करून घेतले. जे या शिबिराला येऊ शकले नाही.. अशा सर्व साधकांसाठी आणि पुनःपुन्हा अभ्यास करण्यासाठी रेकॉर्ड केलेल्या सत्रांचा सर्वांनी जरूर लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी shivgadmurgud@gmail.com या ईमेलवर संपर्क करावा. फोन / whatsapp - 8668823150 संकेत स्थळ - https://www.vedantbhaskar.org ॥ राम कृष्ण हरी ॥ #drshrikrishnadeshmukh #shivgadpariwar #shivgadadhyatmcharitabletrust #dnyaneshwari #bhawarthdipika #ज्ञानेश्वरी #भावार्थदीपिका #संतज्ञानेश्वर #शिवगड #naam #naamjap #naamsadhana #appliedparamarth #muktawalvekar #pramodwalvekar #Shankaracharya #sadhanapanchakam #mandukyaupanishad #mandukya #upanishads @SadhanaVichar @anandachedohi @paramanand9466 @shrikrupaprakashan @shrikrupaprakashan8172 @alkamutalik1640 @vedantbhaskar ⁨@चातुर्मासउत्सवब्रम्हपुरीमहारा⁩ ⁨@AdvaitChinta @VedantBhaskar वेदांत @vastusiddhih @चातुर्मासउत्सवब्रम्हपुरीमहारा @anandachedohi ​