Перейти к содержимому

१६८.सत्र १ - मांडुक्य उपनिषद - शांतीपाठ, परिचय (उपोद्घात) - आ.श्री.प्रदीपदादा लघाटे

Shivgad Pariwar

0:00 / 0:00

१६८.सत्र १ - मांडुक्य उपनिषद - शांतीपाठ, परिचय (उपोद्घात) - आ.श्री.प्रदीपदादा लघाटे

2 826 просмотров · 1 мес. назад
Shivgad Pariwar
5,44 тыс. подписчиков
2 826 просмотров · 1 мес. назад
अभ्यास वर्ग क्रमांक १६८ = मांडुक्य उपनिषद. सत्र १ - विषय : मांडुक्य उपनिषद - शांतीपाठ, परिचय (उपोद्घात) निरूपणकार - आ.श्री.प्रदीपदादा लघाटे दिनांक - २४ ऑगस्ट २०२६ आयोजक - शिवगड अध्यात्म चॅरीटेबल ट्रस्ट. स्थळ - शिवगड श्रीकृष्णनगरी, मुरगुड. शिवगड अध्यात्म चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे २४ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२६ रोजी आद्य शंकराचार्य विरचित मांडुक्य उपनिषद या विषयावर श्रीकृष्ण नगरी शिवगड येथे सद्गुरू डॉ श्रीकृष्ण देशमुख उपाख्य डॉ काकांच्या आशीर्वादाने १६८ वा अभ्यासवर्ग संपन्न झाला. परमार्थाचा अभ्यास करणाऱ्या साधकांना साधना करताना तसेच अभ्यास करताना अनेक प्रश्न, शंका मनात असतात. त्या शंकांचे योग्य निरसन झाल्यास साधनेला चांगली दिशा आणि गती मिळू शकते या विचारांनी हा अभ्यास वर्ग आयोजित केला गेला. या पहिल्या सत्रात मांडुक्य उपनिषद - शांतीपाठ, परिचय (उपोद्घात) हे आ.श्री.प्रदीपदादा लघाटे ह्यांनी सोपा करून ऊलघडून सांगितला. या प्रवचनात मांडुक्य उपनिषदाचा परिचय, त्याची रचना आणि त्यावरील भगवान आदि शंकराचार्यांची कारिकात्मक टीका यांचा परिचय करून देण्यात आला आहे. मांडुक्य उपनिषदावर आधारित शंकराचार्यांची कारिका चार प्रकरणांत "आगम, वैतथ्य, अद्वैत आणि अलातशांती " अशी विभागलेली आहे. "ॐ भद्रं कर्णेभि:" हे अथर्ववेदाचे शांतिपाठ आहे. ‘ॐ’ या एका अक्षरामध्ये संपूर्ण विश्व आणि आत्मतत्त्वाचा निर्देश कसा केला आहे, याची दिशा या अभ्यासातून मिळते. तसेच परमपूज्य डॉ. काका यांनी केलेल्या शांतीपाठाच्या मराठी अनुवादाचाही संदर्भ या अभ्यासात घेतला आहे. या पहिल्या प्रवचनातून मांडुक्य उपनिषदाच्या गहन अभ्यासासाठी आवश्यक अशी पार्श्वभूमी आणि दृष्टी तयार होते. अनेक अभ्यासू साधकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि आपल्या अनेक शंकांचे निरसन करून घेतले. जे या शिबिराला येऊ शकले नाही.. अशा सर्व साधकांसाठी आणि पुनःपुन्हा अभ्यास करण्यासाठी रेकॉर्ड केलेल्या सत्रांचा सर्वांनी जरूर लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी shivgadmurgud@gmail.com या ईमेलवर संपर्क करावा. फोन / whatsapp - 8668823150 संकेत स्थळ - https://www.vedantbhaskar.org ॥ राम कृष्ण हरी ॥ #drshrikrishnadeshmukh #shivgadpariwar #shivgadadhyatmcharitabletrust #dnyaneshwari #bhawarthdipika #ज्ञानेश्वरी #भावार्थदीपिका #संतज्ञानेश्वर #शिवगड #naam #naamjap #naamsadhana #appliedparamarth #muktawalvekar #pramodwalvekar #Shankaracharya #sadhanapanchakam #mandukyaupanishad #mandukya #upanishads @SadhanaVichar @anandachedohi @paramanand9466 @shrikrupaprakashan @shrikrupaprakashan8172 @alkamutalik1640 @vedantbhaskar ⁨@चातुर्मासउत्सवब्रम्हपुरीमहारा⁩ ⁨@AdvaitChinta