Перейти к содержимому

Maharashtra Drought Crisis: 298 तालुके संकटात, Karnataka मध्ये दुष्काळावरून Special Session

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Maharashtra Drought Crisis: 298 तालुके संकटात, Karnataka मध्ये दुष्काळावरून Special Session

50 820 просмотров · 13 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
50 820 просмотров · 13 часов назад
महाराष्ट्रात यंदाच्या मॉन्सनमध्ये सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस पडला, अक्षरशः मान्सूचा परतीचा प्रवास सुरू झाला तरी, अजूनही हेच चित्र कायम आहे. खरीप हंगाम पूर्ण हातून गेलाय, काडीचं शेतकऱ्यांना उत्पन्न होणार नाही, कारण... पिकं पूर्ण करपली आहेत. त्यांना शेंग नाही, दाणे नाहीत, फुलोरा नाही, फळधारणा नाही अशी सगळी शेतकऱ्यांसमोर वाईट परिस्थिती आणि गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे. धक्कादायक म्हणजे राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी तब्बल २९८ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्याची माहिती आता समोर आली आहे. पण याच वेळी शेजारच्या कर्नाटकात वेगळं चित्र दिसतंय. तिथं सरकारने पहिल्या टप्प्यात १०१ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले... नंतर आणखी २३ तालुके त्यात जोडले... आणि आता ही एकूण संख्या १२४ वर पोहोचली आहे. एवढंच नाही... आणखी ५३ तालुक्यांमध्येही प्रत्यक्ष पाहणी सुरूच आहे. महत्त्वाचं म्हणजे याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज, २१ सप्टेंबरपासून कर्नाटक विधानमंडळाचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन सुरू होतंय. म्हणजेच काय तर, आता महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये एकाच प्रश्नाची दोन वेगवेगळी चित्रं आपल्यासमोर आहेत. पण मग आपल्यापेक्षा कर्नाटक कसं पुढे आहे,हाच मुद्दा आहे. आणि याच दुष्काळावरून कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र असा वाद सुरू झाला आहे. तेव्हा नेमकी दोन्ही राज्यात वस्तूनिष्ठ काय परिस्थिती आहे, हा वाद कोणत्या मुद्द्यांवर आहे, दोन्ही राज्यातील सरकार काय करताय, कर्नाटकच्या विशेष दुष्काळी अधिवेशनात काय चर्चा होणार आहे, कोणते निर्णय होण्याची शक्यता हेच आपण सगळं सविस्तर या व्हिडिओत पाहणार आहोत. #MaharashtraDrought #MaharashtraDrought2026 #MaharashtraDroughtCrisis #MaharashtraRainfallDeficit #MaharashtraFarmerCrisis #MaharashtraFarmers #MaharashtraCropLoss #MaharashtraCropDamage #DroughtNews #DroughtCrisis #DroughtDeclaration #KarnatakaDrought #KarnatakaDrought2026 #KarnatakaFarmers #KarnatakaSpecialSession #KarnatakaAssembly #KarnatakaDroughtCrisis #124Taluks #298Taluks #MaharashtraVsKarnataka #MaharashtraKarnataka #FarmerNews #IndianFarmers #CropDamage #RainfallDeficit #Monsoon2026 #MarathwadaDrought #VidarbhaDrought Maharashtra is facing a serious drought-like situation this monsoon, with below-normal rainfall across large parts of the state, severe crop damage and long dry spells. Farmers are now asking one major question — when will drought be officially declared? The situation is particularly concerning as 298 out of 355 taluks have reportedly recorded below-average rainfall. Meanwhile, neighbouring Karnataka has declared 124 taluks drought-affected, while surveys are underway in another 53 taluks. Karnataka’s three-day special Assembly session begins today, September 21, with drought, crop losses, drinking water, fodder, central assistance and the Kasturirangan report expected to be key issues. So, while both Maharashtra and Karnataka are facing a serious drought situation, their government responses appear different. What exactly is happening in both states, why has the Maharashtra-Karnataka drought debate intensified, what are both governments doing, and what major decisions could emerge from Karnataka’s special session? That’s what we’ll examine in detail in this video.