आपण विसरलो ते मसालेच आरोग्य वाचवतील? Diabetes, Gut Health आणि दीर्घायुष्याचं विज्ञान | Dr. Anjali K
Dehbhan
0:00 / 0:00
आपण विसरलो ते मसालेच आरोग्य वाचवतील? Diabetes, Gut Health आणि दीर्घायुष्याचं विज्ञान | Dr. Anjali K
16 019 просмотров · 1 мес. назад
Dehbhan
47,8 тыс. подписчиков
16 019 просмотров · 1 мес. назад
indian spices, मसाल्याचे आरोग्य फायदे, Diabetes, Cancer, Gut Health आणि दीर्घायुष्य यामागे खरंच विज्ञान आहे का? जिरे, हळद, काळी मिरी, मेथी आणि आपल्या रोजच्या फोडणीवर शास्त्रीय संशोधन काय सांगतं, जाणून घ्या या विशेष देहभान Podcast मध्ये.
आपल्या स्वयंपाकघरातला मसाल्याचा डबा फक्त जेवणाची चव वाढवतो की आपल्या आरोग्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावतो?
या विशेष भागात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ. अंजली कुलकर्णी मसाल्यांमधील शक्तिशाली molecules, त्यांच्यावर सुरू असलेले संशोधन आणि आपल्या पारंपरिक आहारामागचं विज्ञान सोप्या मराठीत उलगडून सांगतात.
जिरे आणि शहाजिरे यांचा मधुमेहाशी काय संबंध आहे? हळद जास्त प्रमाणात घेणं खरंच फायदेशीर आहे का? काळी मिरीला “Black Gold” का म्हटलं जात होतं? आमसूल, तिरफळ आणि नागकेशरासारखे पारंपरिक मसाले आपण का विसरत आहोत? मसाल्यांचा Gut Health आणि आपल्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंवर काय परिणाम होऊ शकतो?
तसंच प्रत्येक घराच्या मसाल्याच्या डब्यात कोणते 8 ते 10 मसाले असायला हवेत, मसाले कसे भाजावेत, पावडर मसाले कसे साठवावेत आणि पारंपरिक फोडणीमागे नेमकं कोणतं विज्ञान आहे—यावरही या भागात महत्त्वाची चर्चा आहे. Episode मध्ये मसाल्यांचा वापर प्रमाणात करण्यावर आणि नियमित औषधे स्वतःहून बंद न करण्यावर स्पष्ट भर दिला आहे.
आपल्या आजी-आईच्या स्वयंपाकघरातलं ज्ञान आणि आधुनिक प्रयोगशाळेतलं विज्ञान यांना जोडणारा हा देहभान Podcast चा अत्यंत महत्त्वाचा भाग नक्की पाहा.
09:11 भारताचा मसाल्याचा इतिहास, spice route, leader of spice trade.
19:12 Diabetes Control साठी जिऱ्याचे फायदे, What lab says?
31:55 मसाले Store करण्याची योग्य पद्धत
36:30 Turmeric Latte is good for health? जास्त हळद खाण्याचे फायदे की Side Effects जास्त ?
38:40 मसाल्याच्या डब्यात कोणते मसाले असावेत?
44:00 Diabetes, Heart Disease आणि Cancer मध्ये मसाल्यांची भूमिका
तुमच्या मसाल्याच्या डब्यात कोणते मसाले कायम असतात? Comment मध्ये नक्की सांगा.
देहभान Podcast Subscribe करा आणि अशाच महत्त्वाच्या, दुर्लक्षित विषयांवरील तज्ज्ञांच्या गप्पांसाठी आमच्यासोबत रहा.