खुसखुशीत शंकरपाळी बनवण्याची सोपी पद्धत | दिवाळी स्पेशल फराळ
Mohini’s Recipe - By Mohini Gokhale
0:00 / 0:00
खुसखुशीत शंकरपाळी बनवण्याची सोपी पद्धत | दिवाळी स्पेशल फराळ
230 просмотров · 9 дн. назад
Mohini’s Recipe - By Mohini Gokhale
100 подписчиков
230 просмотров · 9 дн. назад
📝 साहित्य :
१ वाटी साखर
१ वाटी पाणी
१ वाटी तेल
मैदा (आवश्यकतेनुसार)
¼ चमचा मीठ
१ चिमूट बेकिंग सोडा
तळण्यासाठी तेल
👩🍳 कृती
१. एका भांड्यात साखर, पाणी आणि तेल एकत्र करून गॅसवर गरम करा. साखर पूर्ण विरघळेपर्यंत हलवत राहा आणि मिश्रणाला चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करा.
२. तयार मिश्रण थाळीत किंवा भांड्यात काढून पूर्णपणे थंड होऊ द्या.
३. थंड झालेल्या मिश्रणात मीठ आणि चिमूटभर बेकिंग सोडा घालून व्यवस्थित मिसळा.
४. त्यानंतर थोडा थोडा मैदा घालत घट्टसर पीठ मळून घ्या.
५. पिठाचा पोळीएवढा गोळा घेऊन थोडा मळून घ्या आणि पोळीप्रमाणे मध्यम जाडीची लाटून घ्या.
६. लाटलेल्या पोळीच्या कडा काढून सुरीने किंवा कटरने चौकोनी, डायमंड आकारात किंवा आवडीनुसार शंकरपाळी कापून घ्या.
७. कढईत तेल गरम करून गॅस मध्यम आचेवर ठेवा.
८. गरम तेलात शंकरपाळी सोडून सर्व बाजूंनी सारखा रंग येण्यासाठी अधूनमधून हलवत तळा.
९. शंकरपाळीला छान सोनेरी रंग आला की तेलातून काढून घ्या. जास्त गडद होऊ देऊ नका, कारण काढल्यानंतरही रंग थोडा बदलतो.
१०. अशाच प्रकारे सर्व शंकरपाळी तळून घ्या. खुसखुशीत, कुरकुरीत आणि चविष्ट गोडाची शंकरपाळी तयार आहे! 😋🪔
Follow me on Instagram: / mohini_gokhale
📝 DM me to place your order!
#shankarpali #sweetshankarpali #diwalispecial #diwalifaral #diwalirecipes #marathirecipes #homemade #faralrecipe #crispyshankarpali #traditionalrecipe #mohiniskitchen #marathirecipes #indianrecipes #homemaderecipes #homecooking #foodrecipes #easyrecipes #recipeoftheday #foodlover #tastyfood #yummyfood #cookathome #kitcheninspiration #healthyrecipes #vegetarianrecipes