Перейти к содержимому

Raj Thackeray : सत्ता नाही, आमदार नाहीत...तरीही 'राज' दरबार Majha Vishesh

ABP MAJHA

0:00 / 0:00

Raj Thackeray : सत्ता नाही, आमदार नाहीत...तरीही 'राज' दरबार Majha Vishesh

80 632 просмотра · 2 дня назад
ABP MAJHA
16,4 млн подписчиков
80 632 просмотра · 2 дня назад
#rajthackeray #mns #majhavishesh #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics आता बातमी आहे एका अशा राजकीय नेत्याची... ज्यांच्याकडे आज सत्ता नाही... विधानसभेत एकही आमदार नाही... लोकसभेतही प्रतिनिधित्व नाही... तरीही राज्यातील विविध घटक आपले प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जातात... बातमी आहे राज ठाकरेंची .... विद्यार्थ्यांचा प्रश्न असो... स्पर्धा परीक्षांचा असो... नोकरभरतीचा असो... शेतकऱ्यांचा असो... कंत्राटदारांचा असो... किंवा मराठी भाषेचा...प्रश्न सुटत नसतील तर अनेकजण थेट राज ठाकरेंकडे धाव घेताना दिसतात. आजही एमपीएससीचे विद्यार्थी आणि कंत्राटदारांच्या माध्यमातून हेच चित्र दिसलं.. राज्यभरातल्या कंत्राटदारांची तब्बल ८६ हजार कोटी रुपयांची थकबाकी सरकारकडे प्रलंबित असल्याचा दावा कंत्राटदार संघटनांकडून करण्यात येतोय. या थकबाकीसाठी राज्यातील विविध भागांत कंत्राटदारांकडून गेल्या काही दिवसांपासून आंदोलनं सुरू आहेत. मात्र, या आंदोलनांची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याची कंत्राटदारांची तक्रार आहे. हीच तक्रार घेऊन कंत्राटदार पोहोचले राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर..या प्रश्नात राज ठाकरे मध्यस्थी करुन कंत्राटदारांची थकबाकी मिळवून द्यावी अशी अपेक्षा कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली...कंत्राटदारांसोबतच एमपीएससीच्या मुलांनीही आज राज यांची भेट घेतली.. ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या पेपरफुटीचा मुद्दा मुलांनी राज ठाकरेंसमोर मांडला. या प्रकरणी स्पष्ट पुरावे देऊनही अद्याप FIR दाखल झाला नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी राज यांच्यासमोर गाऱ्हाणं मांडलं आज कंत्राटदार आणि एमपीएसीच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या भेटीनंतर राज ठाकरेंच्या राजकीय ईमेजची चर्चा नव्यानं रंगलीये..गेल्या काही वर्षात राज ठाकरेंनी सत्तेबाहेर राहून एक वेगळी राजकीय भूमिका तयार केलीये... प्रश्न ऐकणारा नेता...प्रश्नाला आवाज देणारा नेता...आणि गरज पडली तर तोच प्रश्न थेट सत्तेच्या दारात नेऊन उभा करणारा नेता! त्यामुळे राज ठाकरेंची ही ‘प्रॉब्लेम सॉल्व्हर’ इमेज म्हणजे केवळ राजकीय प्रतिमा आहे... की सत्तेबाहेर राहून तयार झालेलं एक प्रकारचं प्रति राजकीय केंद्र? याचाच राजकीय अर्थ समजून घेणार आहोत पुढच्या रिपोर्टमधून... राजकारणात आवाज उठवणं वेगळं असतं आणि सत्तेत बसून तो आवाज कायद्यात, निर्णयात रूपांतरित करणं वेगळं असतं. प्रतिमा तयार करणं ही एक कला असते. पण तीच प्रतिमा मतांमध्ये, संख्याबळात रूपांतरित करणं ही त्याहून कठीण कसोटी असते. राज ठाकरेंनी लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि त्यांचं दुःख समजून घेण्याची पहिली परीक्षा तर पास केलीय पण मतपेटीची, सत्तेची, संघटनात्मक ताकदीची दुसरी परीक्षा अजून बाकी आहे. ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook:   / abpmajha   Twitter:   / abpmajhatv   Instagram :   / abpmajhatv   Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de... एबीपी माझा LIVE | महाराष्ट्रातील बातम्या | मराठी बातम्या | ABP Majha LIVE TV | ABP Majha Marathi news | ABP Majha news LIVE | News Today Live | Breaking news LIVE | Maharashtra Politics | Vidhan Parishad Election | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sunetra Pawar | Mumbai Rains update | Maharashtra Weather | Monsoon | Missing Link | Mumbai Rain | Pune Rain | Maharashtra Rain |