Перейти к содержимому

जांबुवंत मंदिर संपूर्ण माहिती,जामखेड परिसर ता.अंबड,जालना.

dattaSHINDE

0:00 / 0:00

जांबुवंत मंदिर संपूर्ण माहिती,जामखेड परिसर ता.अंबड,जालना.

1 035 просмотров · 4 г. назад
dattaSHINDE
3,92 тыс. подписчиков
1 035 просмотров · 4 г. назад
#Jambuwnt_mandir##Jambvnt_mandir# #जांबुवंत_मंदिर# जांबुवंत मंदिर माहिती भारतातील एकमेव मंदिर भारतातील एकमेव जांबुवंत मंदिर हे महाराष्ट्रात आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील जामखेड या गावच्या शिवारात हे हजारो वर्ष जुने गुहेतील पुरातन मंदिर आहे. जांबुवंत मंदिराला एक मोठा इतिहास आहे.हनुमान यांच्यासमवेत जांबुवंत हे राम आणि कृष्णा या दोन्ही अवतारांसाठी उपस्थित असलेल्यांपैकी एक मानले जाते. समुद्राच्या मंथनासाठी हजर असल्याचे आणि कुर्म अवताराचे साक्षीदार असल्याचे सांगितले आणि पुढे वामन अवतार, जांबुवंत हे चिरंजीवांचे दीर्घकाळ जगणारे असू शकतात आणि नऊ अवतारांचे साक्षीदार आहेत. जांबुवंत हा या जमातीतील सर्वश्रेष्ठ नरपुंगव (मनुष्य व वानर म्हणजे अस्वल असा एक प्रकार). तत्कालीन समाजात त्याला मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. तो एक पराक्रमी ऋक्षराज होता. तो सुग्रीवाचा सेनापती असून राम-रावण युद्धात एक ज्येष्ठ आणि वयोवृद्ध वानरसेनापती या नात्याने त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. जांबुवंताचा जन्म ब्रह्मदेवाच्या जांभईपासून झाला होता. हा धूम्र नामक वानराचा ज्येष्ठ बंधू पुत्र होता. ब्रह्मंडपुराणाच्या मते हा प्रजापती व रक्षा यांचा पुत्र असून त्याच्या पत्नीचे नाव वघ्री आणि कन्येचे नाव जांबवंती असे होते. जांबुवंत हा प्रखर शिवभक्त होता. त्याने ‘दशांग’ नावाच्या पर्वतावर एका शिवलिंगाची स्थापना केली होती. पुढे त्याच्याच नावावरून हे लिंग ‘जांबवंत लिंग’ म्हणून ओळखले जाऊ लागले. याबद्दल अशी पण कथा आहे की सत्राजित ( सत्यभामाचे पिता) राजाने श्रीकृष्णा वर त्यांना सुर्याकडून मिळालेला संमत्यक मनी, त्यांचा बंधु प्रसेनजीत याचा वध करून चोरला असा आरोप केला होता. यातील वास्तविकता अशी होती की त्याला अरण्यात शिकारीला गेला असता, सिंहाने मारले होते. जेव्हा सिंह हा समंत्यक मणी घेऊन चालला होता, त्यावेळेस जांबुवंताने त्या सिंहाला मारून टाकले व समंत्यक मनी घेऊन गेला. श्रीकृष्णाने सिंहाचे व अस्वलाच्या पाऊल खुनावरून, जांबुवताच्या गुहेत प्रवेश केला. जांबुवंता बरोबर युद्ध चालू असतांना, जांबुवंत घायाळ झाला, तेव्हा त्याने रामाचा धावा केला. डोळे उघडुन बघतो, तर राम समोर हजर होते. श्रीराम जन्मात रामाने वचन दिले होते की, त्रेता युग संपले की द्वापारयुग सुरू होईल. त्यावेळेस ते जांबुवताबरोबर युद्ध करतील. त्याची आठवण जांबुवंताला झाली. त्यांनी, श्रीकृष्णाबरोबर, त्यांची मुलगी जांबुवंती हिचे लग्न लावून दिले. त्यावेळेस जांबुवंताने वैकुंठाला जाण्याची ईच्छा व्यक्त केली. तेव्हा श्रीकृष्णाने तथास्तु म्हणून अवतार कार्य संपविण्याची परवानगी दिली, व वैकुंठास गेला. #Shriram_Hanuman_Ravan#