Перейти к содержимому

Sudhagad Fort | पाली-सुधागड | किल्ले सुधागड (संपूर्ण माहिती मराठीत)

Pravas Gadkillyancha

0:00 / 0:00

Sudhagad Fort | पाली-सुधागड | किल्ले सुधागड (संपूर्ण माहिती मराठीत)

1 345 просмотров · 4 г. назад
Pravas Gadkillyancha
584 подписчика
1 345 просмотров · 4 г. назад
भोर संस्थानाचे वैभव असलेला सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणाऱ्या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरी. अतिशय प्रशस्त असे पठार असलेला हा किल्ला एक प्राचीन किल्ला आहे. सुधागड परिसरातील ठाणाळे आणि खड्सांबळे लेण्यांचे अस्तित्व असल्यामुळे ते सिद्ध होते. याला पहिले भोरपगड असेही म्हणत. १६४८ साली किल्ला हिंदवी स्वराज्यात दाखल झाला. पालीपासून भिरा कडे जाणाऱ्या हमरस्त्यावर ८ किमी वर पाच्छापूर गाव आहे. येथून पुढे ठाकूरवाडी अथवा दर्यागाव वसलेले आहे. येथून एका सोप्या पायवाटेने गडावर २ तासात आपण पोचतो. ठाकूरवाडीतून वर जाताना मध्ये लोखंडी शिडी लागते. पाच्छापूर गावातूनही एक वाट वर येते. या दोन्ही वाटा एका घळीपाशी मिळतात. येथे महाकाय चिलखती बुरुज आपले स्वागत करतात. या घळीतून वर गेल्यावर आपण एका पडक्या दरवाजातून जातो, हाच पाच्छापूर कडील दरवाजा. येथून आपण १५ मिनिटे चढल्यावर गडमाथ्यावर पोचतो. पालीहून नाडसूर / धोंडसे गावी पोचून आपल्याला येथून दगडी पायऱ्यांच्या मार्गाने गडावर पोचता येते. इथली वाट झाडीतून असल्यामुळे सुखद आहे, पण येथून चढण्यास अंदाजे २.५ ते ३ तास लागतात. तेलबैला जवळून उतरणारा सवाष्णीचा घाट हा आपल्याला याच मार्गावर घेऊन येतो. येथून आपण गडाच्या गोमुखी पद्धतीच्या महादरवाजातून प्रवेश करत थेट भोराई देवीच्या मंदिरात पोचतो. Follow us on Instagram : https://instagram.com/prvaasgddkillya... Music Credit : I Found an Answer by Twin Musicom is licensed under a Creative Commons Attribution 4.0 licence. https://creativecommons.org/licenses/... Artist: http://www.twinmusicom.org/ Information About History : Google Page / You tube search चित्रिकरण - शुभम कोलंबेकर / विनायक जाधव / शेखर खडपे चित्रिकरनाची साधने - MI Note 9 Pro Max Mobaile / Moza Mini MX Gimbal Like Comment And Please Subscribe Channel #sudhagad #trek