नामस्मरणाने दत्त प्राप्ती कशी करावी?सोपी आणि प्रभावी पद्धत
Gurumauli गुरुमाऊली
0:00 / 0:00
नामस्मरणाने दत्त प्राप्ती कशी करावी?सोपी आणि प्रभावी पद्धत
10 853 просмотра · 3 дн. назад
Gurumauli गुरुमाऊली
92,8 тыс. подписчиков
10 853 просмотра · 3 дн. назад
नामस्मरणाने दत्त प्राप्ती कशी करावी?सोपी आणि प्रभावी पद्धत @gurumauli2021
नामस्मरण: श्रीदत्त प्राप्तीचा सहज मार्ग ।।
मित्रानो,.मागील जन्मातील आपल्या कर्मांमुळे आपले अनेक प्रकारचे स्वभाव, वासना आणि विविध संस्कार बनत गेले आहेत.या अनेक जन्मांच्या प्रवासात आपण चांगल्या आणि वाईट दोन्ही संस्कारांच्या आहारी गेलो आहोत?या भूतकाळातील कर्मांमुळे आपण आतून खूप अशुद्ध झालो आहोत आणि आपल्या मनात नकळतपणे अनेक वाईट गोष्टी भरल्या गेल्या आहेत. अनेक जन्मांची साचलेली ही अशुद्धता आणि अपवित्रता हेच आपल्या मनाच्या सतत भटकण्याचे मुख्य आणि मूळ कारण आहे. आणि त्यामुळेच आपण नकारात्मक विचार, नकारात्मक कर्म आणि नकारात्मक बोलणे अगदी सहज करतो.याउलट, सकारात्मकता आपल्याला मुद्दामहून निर्माण करावी लागते, सकारात्मक राहण्यासाठी मनापासून तसे प्रयत्न करावे लागतात.आपल्या आतील हा दूषितपणा, नकारात्मकता आणि अपवित्रता मुळापासून दूर करण्यासाठी केवळ एकच अमोघ उपाय आहे, तो म्हणजे 'दत्त प्रभूंचे नामस्मरण'. आपण घेतलेल्या नामाचा आपल्या अंतःकरणावर अतिशय खोल परिणाम होतो आणि आपले अंतरंग आतून हळूहळू बदलू लागते.या मानसिक आणि अध्यात्मिक अशुद्धतेवर जगामध्ये नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताही सोपा मार्ग नाही.
मित्रांनो अनेक जण विचारतात की श्रीदत्त प्रभूंची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि त्यांचे दिव्य अनुभव घेण्यासाठी नक्की कोणत्या नामाचा उच्चार करावा, अर्थात कोणते नामस्मरण करावे? दत्त प्रभूंचे कोणते नाम घेऊ असें विचारणे म्हणजे मिठाई कोणती खाऊ असें विचारल्यासारखेच आहे..?कारण मिठाई कोणतीही असो, तिचा मूळ गुणधर्म जसा गोडवा देणे हा असतो, अगदी तसेच परमेश्वराच्या प्रत्येक नामाचे अंतिम फळ एकच असते श्रीदत्तगुरूंनी आपली संपूर्ण दिव्य शक्ती, सामर्थ्य आणि चैतन्य स्वतःच्या नामामध्ये साठवून ठेवले आहे, मग ते कोणतेही नाम असो ते 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त' असो किंवा 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' असो, दोन्ही नामे तितकीचं चैतन्यमयी आहेत आणि तुम्हाला श्री दत्त प्रभूंची प्राप्ती नक्की करून देणारी आहेत त्यामुळे "कोणते नाम श्रेष्ठ आणि कोणते कनिष्ठ, असा विचार किंवा संभ्रम मनात आणणे सुद्धा पूर्णपणे चुकीचे आहे. परमेश्वराची सर्व रूपे आणि त्यांची विविध नामे ही सर्वश्रेष्ठ, स्वयंभू आणि पूर्णत्वाने युक्त आहेत, त्यामध्ये कोणताही भेद नाही. ईश्वराच्या वेगवेगळ्या नामांमध्ये भेद करणे हा आपल्या मानवी मनाचा दोष आहे परंतु ईश्वरी तत्त्वात असा कोणताही भेद नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही नामाचा जप करा, जर मनामध्ये अनन्य भाव आणि व्याकुळता असेल, तर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती अवश्य होणार आहे. मुख्य गोष्ट नामाची निवड नसून, आपला आपल्या भक्तीवर आणि अखंड श्रद्धेवर असलेला ठाम विश्वास आहे म्हणूनच, तुमच्या अंतःकरणाला जे नाम अत्यंत प्रिय वाटते, ज्या नामाने मनाला शांतता मिळते, तेच नाम तुम्ही आनंदाने घ्यावे. कोणाला 'श्रीपाद श्रीवल्लभ' प्रिय वाटले, कोणाला 'नृसिंह सरस्वती', तर कोणाला केवळ 'दत्त' या दोन अक्षरांच्या जपाने तारले. उच्चार जरी वेगवेगळे असले तरी त्या सर्वांचे अंतिम ध्येय आणि पोहोचण्याचे ठिकाण एकच आहे म्हणूनच मनातील सर्व शंका-कुशंका बाजूला सारून, पूर्णपणे निर्धास्त होऊन दत्त प्रभूंचे नाम घ्या, कारण कलियुगात केवळ नामस्मरण हाच आपला खरा उद्धार करणारा आणि संकटातून तारणारा एकमेव आणि सर्वात सोपा मार्ग आहे. दत्त महाराज हे केवळ भावाचे भुकेले आहेत, त्यामुळे जपाची संख्या आणि मनातील भाव वाढवा, तो कृपाळू परमात्मा तुम्हाला त्याचे अद्भुत अनुभव दिल्या शिवाय राहणार नाही जो मनुष्य दत्त नामाचा आश्रय घेतो, त्याला या जगात कोणत्याही गोष्टीची भीती उरत नाही आणि त्याचे जीवन आनंदाने भरून जाते.अंतःकरणातील मलीनता नष्ट करून आत्मिक प्रगती साधण्यासाठी नामस्मरण हेच कलियुगातील मानवासाठी सर्वात मोठे वरदान आणि अमृत आहे
#namsmaran #sadhana #namjap #dattamantra #spiritualvideo
#datta #dattaguru #gurudevdatta #shreeswamisamarth #dattatreya #shreenrusihasaraswati
#dattabhakti #bhakti #dharmik #devotional #marathi #marathivlog #marathiviralvideo #viral #trending #sayali