तुंबाडचे खोत कादंबरी कुठे लिहिली. तुंबाड तुम्हीं पाहिल आहे का? #तुंबाडचेखोत #tumbad
Aiklay Ka?
0:00 / 0:00
तुंबाडचे खोत कादंबरी कुठे लिहिली. तुंबाड तुम्हीं पाहिल आहे का? #तुंबाडचेखोत #tumbad
10 892 просмотра · 6 дней назад
Aiklay Ka?
822 подписчика
10 892 просмотра · 6 дней назад
“तुंबाडचे खोत” म्हणजे श्री. ना. पेंडसेंनी घडवून आणलेला चमत्कार. जो कोणी हि कादंबरी वाचतो तो कोकणच्या वर्णनाने, जगबुडीने आणि तुंबाडच्या खोतामधील शे सव्वाशे पात्रांनी भारावून जातो. #kokan
जेव्हा भाऊसाहेब आपलं घराणं शोधत तुंबाड मध्ये येऊन पोहचतात, तेव्हा त्यांना बाबल्याशेट भेटतात आणि तेच मग पुढे खोतांच्या पिढ्यांचा इतिहास सांगतात. अश्या बाबल्याशेटांबद्दल कादंबरीमध्ये पुढील वाक्य आहे. “ बाबल्याशेट हे प्रकरणच वेगळं. त्यांच्या बोलण्या - वागण्यातील अधिकार, आर्जव, अगत्य, शहाणपणा जाणवत होता.”
तुंबाडचे खोत लिहायचं आहे हा विचार हर्णे, दापोली, आयनी (कादंबरीतील लिंबाड), मुर्डी(कादंबरीतील साखरपेंडी),आसूद (कादंबरीतील गारंबी) आणि व्याघ्रेश्वर ह्या निसर्गरम्य परिसरामुळे आधीपासून श्री.ना च्या मनात होताच, पण त्यांना त्याच्या “मनातील” जागा सापडत नव्हती. “बाबल्याशेट वरवाटकरांची - डोंगर उतारावरील अपूर्व वास्तू समोरून वाहणारी; थोड पुढे जाऊन धनुष्यासारखं वळण घेणारी जगबुडी, समोरच्या डोंगरावर “आयनी” गाव हे सर्व पाहून “शिरुभाऊंना” त्यांच्या मनातील जागा सापडली त्यांच्या आणि बाबल्याशेटच्या बोलण्यातून “शिरुभाऊंच्या” मनात “तुंबाडचे खोत” साकार होत होते.
आज आपण हीच जागा पाहणार आहोत.
#aiklayka #ऐकलंयका #marathipodcast #marathi #motivation #tumbaad #तुंबाड #तुंबाडचेखोत #shrinapendse#कोकण