सावधानता, अप्रमाद आणि वीर्य | प्रज्ञारूपी गिरीशिखरावर आरूढ | दुःख सुख दान दया #buddha #jaybhim
Mindof_Grey - Buddha Dhamma
0:00 / 0:00
सावधानता, अप्रमाद आणि वीर्य | प्रज्ञारूपी गिरीशिखरावर आरूढ | दुःख सुख दान दया #buddha #jaybhim
9 просмотров · 3 дн. назад
Mindof_Grey - Buddha Dhamma
44 подписчика
9 просмотров · 3 дн. назад
नमो बुद्धाय, जय भीम! 🙏
चतुर्थ खंड : भाग-3 | ५:३:९ ते ५:३:१० | ५:३:११ ते ५:३:१२
सावधानता, अप्रमाद आणि वीर्य + दुःख सुख : दान आणि दया + धम्मिकता
९. सावधानता, अप्रमाद आणि वीर्य
१. जेव्हा अप्रमादी सावधान चित्ताने प्रमादरहित होतो, क्रोध मुक्त होतो, तेव्हा तो प्रज्ञारूपी गिरीशिखरावर आरूढ होतो आणि दुःख सागरात बुडालेल्या मानव जातीकडे दृष्टीक्षेप करतो. ज्याप्रमाणे गिरीशिखरावर उभा असलेला सुज्ञ गिरीपायथ्याशी असलेल्या अज्ञानींच्या समूहाकडे नजर टाकतो त्याचप्रमाणे प्रज्ञावंत दुःख सागरात बुडालेल्या मानवजातीकडे पाहतो.
२. प्रमादीमध्ये अप्रमादी, निद्रिस्तामध्ये जागृत, हा ज्याप्रमाणे कुशल सुदृढ वाजक (घोडा) दुर्बल वाजूला मागे सारून पुढे जातो, त्याप्रमाणे हा सुज्ञ माणूस इतरांना मागे टाकून धम्मपथावर अग्रेसर होतो.
३. प्रमादाच्या आहारी जाऊ नका. इंद्रिय वासनांच्या मोहजाळात गुंतु नका. अप्रमादी माणूस चिंतनशील असतो, ध्यानलाभ करतो.
४. अप्रमाद हा अमृतपथ आहे, प्रमाद हा मृत्युपथ आहे. अप्रमादी अमर्त्य आहेत; जे प्रमादी आहेत त्यांचा मृत्यू झालेलाच आहे.
५. जीवित ध्येयापासून विचलित होऊ नका. दुसऱ्या कितीही मोठ्या हेतू निर्दिष्ट्यर्थ आपल्या जीवित ध्येयापासून विचलित होऊ नका. एकदा तुम्हाला तुमचे उद्दिष्ट पक्के झाल्यावर निष्ठेने, दृढपणे त्याला बांधिल असावे.
६. सावधान असावे. आलस्याचा त्याग करावा. सत् मार्गाचे गामी व्हावे. सत् मार्गाचे गामी झालात तर या जगी सुख पावाल.
७. प्रमाद एक कलंक आहे. प्रमाद, निरंतर प्रमाद ही अपवित्रता आहे. निरंतर प्रयासरत रहावे. प्रयास आणि प्रज्ञा यांच्या सहाय्याने प्रमादरूपी विषयुक्त बाण उपटून काढावा.
८. प्रमादात फसू नका. इंद्रिय वासनांच्या आहारी जाऊ नका. सावधान चित्त, अप्रमादी, समाधीस्थ आहेत त्यांना असीम सुखाची प्राप्ती होते.
९. अप्रमादी, सावधान चित्त माणूस जो स्मृतीमान आहे, त्याला विस्मृती होत नाही. त्याचे कर्म पवित्र आहे, जो विवेकाचे आचरण करतो, जो संयत आहे, जो ब्रम्हमय जीवन जगतो, अशा माणसाचे यश सतत वृद्धिंगत होते.
१०. दुःख सुख : दान आणि दया
१. दारिद्र्य दुःखाचे मूळ आहे.
२. परंतु दारिद्र्यामुळे मिळूनच सुख प्राप्त होईलच असे नाही.
३. उच्च जीवनस्तर नाही तर श्रेष्ठ सांस्कृतिक जीवनात सुख अवलंबून आहे.
४. हाच बौद्ध जीवन मार्ग होय.
५. क्षुधा हा महाभयानक रोग आहे.
६. स्वास्थ्य सर्वात मोठी देण होय. संतोष सर्वश्रेष्ठ धन, विश्वास श्रेष्ठतम नाते आणि निर्वाण श्रेष्ठतम सुख होय.
७. जे आपला द्वेष करतात त्यांचा द्वेष न करता खरंच आपण सुखाने जीवन जगणे शिकले पाहिजे.
८. व्याधिग्रस्त समाजात व्याधिमुक्त होऊन खरंच आपण सुखाने जगणे शिकले पाहिजे.
९. लोभग्रस्त समाजात लोभमुक्त होऊन खरंच आपण सुखाने जगणे शिकले पाहिजे.
१०. तणाने शेत नष्ट होते तसेच कामविकाराने मानवजात लयास जाते. म्हणून जे प्रमाद विरत आहेत त्यांना दान केल्याने श्रेष्ठ फळ प्राप्त होते.
११. जसे तणाने शेत नष्ट होते तसेच प्रमादाने मानवजात लयास जाते. म्हणून जे प्रमाद विरत आहेत त्यांना दान केल्याने श्रेष्ठ फळ प्राप्त होते.
५:३:११ धम्मिकता | ५:३:१२ सम्यक मार्गानुसरण
१. कोणीही मिथ्या कथन करू नये. सत्यकारणे असत्य कथन, मिथ्या कथन टाळावे.
२. तथागत जसे कथन करतो तसेच आचरण करतो. तसेच आचरण करतो तसेच कथन करतो, तो यथा भाषी तथा कारी आणि यथा कारी तथा भाषी आहे म्हणून त्याला तथागत म्हणतात.
५. सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण होय.
६. अष्टांगिक मार्ग हा श्रेष्ठतम मार्ग होय. चार आर्य सत्य श्रेष्ठतम सत्य होत. विराग हा सर्वश्रेष्ठ धम्म होय. चक्षूवान (बुद्ध) हा श्रेष्ठतम पुरुष होय.
७. प्रज्ञेच्या विशुद्धीहाच एकमेव मार्ग आहे. याशिवाय अन्य दुसरा कोणताही मार्ग नाही. आपण याच मार्गाचे अनुसरण करावे.
५. सावधान व्हा. प्रमादी होऊ नका. धम्माच्या देशनेचा मार्ग अनुसरा. जो धम्म देशनेच्या मार्गाचे अनुसरण करतो तो इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुख पावतो.
६. धम्माच्या मार्गाचे अनुसरण करा. अधम्माच्या मार्गाचे अनुसरण करू नका. जो धम्म देशनेच्या मार्गाचे अनुसरण करतो तो इहलोकी सुख पावतो.
जय भीम, नमो बुद्धाय! @mindof_grey