Перейти к содержимому

गाणं चित्रपटातून Reject होणार होतं... पण प्रसिद्ध झालं तर गाजलं!"

JUST-ENJOY

0:00 / 0:00

गाणं चित्रपटातून Reject होणार होतं... पण प्रसिद्ध झालं तर गाजलं!"

41 092 просмотра · 1 месяц назад
JUST-ENJOY
6,31 тыс. подписчиков
41 092 просмотра · 1 месяц назад
मित्रांनो, महाराष्ट्राच्या मातीतल्या ज्या लावणीने इतिहास रचला, ते गाणं म्हणजेच 'सोळावं वरीस धोक्याचं! ' पण तुम्हाला ठाऊक आहे का? हे गाणं खरं तर फ्लॉप ठरेल म्हणून चित्रपटातून कायमचं बाहेर काढलं जाणार होतं! चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तर या गाण्याचे शब्द ऐकून कपाळावर हात मारला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत 'सवाल माझा ऐका' (१९६४) या चित्रपटातील या अजरामर लावणीचा पडद्यामागचा रंजक इतिहास. गीतकार जगदीश खेबूडकर, संगीतकार वसंत पवार आणि लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्यातील तो वाद आणि संघर्ष नक्की काय होता, याची संपूर्ण गोष्ट स्वतः सुलोचनाबाईंच्या 'माझं गाणं... माझं जगणं' या आत्मचरित्राच्या संदर्भासह या व्हिडिओमध्ये मांडली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा! ध्रुवपद: तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं अन् सोळावं वरीस धोक्याचं गं, सोळावं वरीस धोक्याचं बाई, सोळावं वरीस धोक्याचं गं, सोळावं वरीस धोक्याचं कडवे १: पिसाट वारा मदनाचा, पतंग उडवी पदराचा पिसाट वारा मदनाचा बाई, पतंग उडवी पदराचा तोल सुटावा अशी वेळ ही... तोल सुटावा अशी वेळ ही तरी चालणं ठेक्याचं सोळावं वरीस धोक्याचं गं, सोळावं वरीस धोक्याचं कडवे २: रात रुपेरी फुलली गं, मला पौर्णिमा भुलली गं अंगावरती सांडू लागले, टिपूर चांदणं रुप्याचं सोळावं वरीस धोक्याचं गं, सोळावं वरीस धोक्याचं कडवे ३: ओढ लागली संगतीची, नजर भेटीच्या गमतीची आज मला हे गुपीत कळलं, जत्रेमधल्या धक्क्याचं सोळावं वरीस धोक्याचं गं, सोळावं वरीस धोक्याचं #SolavaVarisDhokyacha #SulochanaChavan #MarathiLavani #marathicinema #JagdishKhebudkar #VasantPawar #JayashreeGadkar #SavalMajhaAika #BehindTheScenes #marathiyoutuber #LavaniHistory #Lavani#IndianFolkDance#HistoryOfLavani #IndianCulture#traditionaldance #DocumentaryIndia#FolkArt