ब्रेकिंग! पुणे: जुन्नरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Baymanus
0:00 / 0:00
ब्रेकिंग! पुणे: जुन्नरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
5 266 просмотров · 9 дней назад
Baymanus
30,7 тыс. подписчиков
5 266 просмотров · 9 дней назад
ब्रेकिंग! पुणे: जुन्नरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जुन्नर तालुक्यातील खोडद गावाच्या हद्दीत, हॉटेल दोस्तीच्या मागील बाजूस राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली कारवाई
पर्दाफाश करणाऱ्या प्रसाद हिंगे सोबत Exclusive बातचीत.
【टीम बायमाणुस】
पुणे|(सोमवार ७ सप्टेंबर २०२६): जुन्नरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
जुन्नर तालुक्यातील खोडद गावाच्या हद्दीत, हॉटेल दोस्तीच्या मागील बाजूस ५ सप्टेंबरला रात्री १० वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत दोन व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत आकाश लखन राजपूत, वय २५ वर्षे,( रा. भोरवाडी, ता. जुन्नर )आणि विशाल गंगाराम पानमंद, (वय ३९ वर्षे, रा. खोडद, ता. जुन्नर) यांना आरोपी करण्यात आले आहे.
कारवाईदरम्यान विविध ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 6 हजार 650 रुपये असल्याचे गुन्ह्याच्या नोंदीत नमूद आहे.
या प्रकरणाची नोंद अपराध क्रमांक 194/2026 अशी करण्यात आली असून, गुन्ह्याची प्रत न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, जुन्नर यांच्या न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
दरम्याच एकूणच तालुक्यातील पिंपळवंडी,आळेफाटा,ओतूर,जुन्नर,मांजरवाडी,साकोरी, बेल्हे परीसरात सुद्धा अनेक ठिकाणी अवैध धाबे व हॉटेल वर दारू विक्री सुरू असल्याने या ठिकानी सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी याच विषयावर आवाज उठवनाऱ्या प्रसाद हिंगे यांनी आमच्या सोबत बोलताना केली केली आहे.