Перейти к содержимому

खासदारसुद्धा लोकप्रतिनिधी असतात,याचा महाराष्ट्र शासनाला विसर पडलाय का?.खा.डॉ. कोल्हेचा थेट सवाल.

Baymanus

0:00 / 0:00

खासदारसुद्धा लोकप्रतिनिधी असतात,याचा महाराष्ट्र शासनाला विसर पडलाय का?.खा.डॉ. कोल्हेचा थेट सवाल.

1 652 просмотра · 8 дней назад
Baymanus
30,7 тыс. подписчиков
1 652 просмотра · 8 дней назад
खासदारसुद्धा लोकप्रतिनिधी असतात, याचा महाराष्ट्र शासनाला विसर पडलाय का?. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सरकारला थेट सवाल..जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपातील दुजाभावावर कडाडून टीका 【टीम बायमाणुस】 पुणे:(जुन्नर,बुधवार दि.९ सप्टेंबर २०२६):खासदारसुद्धा जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतात, याचा महाराष्ट्र सरकारला विसर पडला आहे का?" असा रोखठोक सवाल शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपातून खासदारांना पद्धतशीरपणे वगळून सुरू असलेल्या राजकीय मनमानीवर त्यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे 'एका  नागरी सहकारी पतसंस्थे'च्या नूतन शाखेचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात बोलताना डॉ. कोल्हे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपाचे आकडेच समोर मांडले. ते म्हणाले, "सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर असताना, ७० टक्के निधी आमदारांच्या शिफारशीनुसार आणि ३० टक्के पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत देण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. जर संपूर्ण निधी आमदार आणि पालकमंत्र्यांमध्येच वाटला जाणार असेल, तर मतदारसंघातील जनतेने खासदारांकडे दिलेली विकासकामांची निवेदने आम्ही रद्दीत टाकायची का? खासदारांनी केवळ 'बघतो आणि करतो' एवढेच म्हणायचे का?" डीपीडीसीच्या निधीत केंद्राचाही मोठा वाटा असतो याकडे लक्ष वेधत ते पुढे म्हणाले, "एका विधानसभा मतदारसंघात एक आमदार असतो, तर एका खासदाराकडे तब्बल ६ विधानसभा मतदारसंघांचे व्यापक कार्यक्षेत्र असते. नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्व खासदारांनी मुख्यमंत्र्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. तरीही ६ विधानसभांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांना बाजूला सारून असा दुजाभाव केला जात असेल, तर हा एकांगी विकास असून लोकशाही व्यवस्थेला हरताळ फासणारा आहे."  पाहूयात नेमकं काय म्हणाले खासदार डॉ अमोल कोल्हे..यावेळी #अमोलकोल्हे #डॉअमोलकोल्हे #शिरूरलोकसभा #जुन्नर #पुणे #खासदार #लोकप्रतिनिधी #जिल्हानियोजनसमिती #DPDC #निधीवाटप #निधीवाटपातीलदुजाभाव #महाराष्ट्रसरकार #राज्यसरकार #पालकमंत्री #आमदार #विकासकामे #लोकशाही #राजकारण #महाराष्ट्रराजकारण #पुणेराजकारण #शिरूर #गुंजाळवाडी #TeamBaimanus #बायमाणुस #BreakingNews #MaharashtraNews #PuneNews #JunnarNews