Mahant Krushna Maharaj Shastri यांची चतुर्थ उत्तराधिकारी म्हणून निवड, Bhagwan Gad | Karyarambh
karyarambh
0:00 / 0:00
Mahant Krushna Maharaj Shastri यांची चतुर्थ उत्तराधिकारी म्हणून निवड, Bhagwan Gad | Karyarambh
24 014 просмотров · 9 часов назад
karyarambh
187 тыс. подписчиков
24 014 просмотров · 9 часов назад
#भगवानगड #कृष्णामहाराजशास्त्री #नामदेवशास्त्रीमहाराज #संतभगवानबाबा #गोपीनाथमुंडे #पंकजामुंडे #धनंजयमुंडे #भगवानगडइतिहास #भगवानगडदसरामेळावा #बीड #महाराष्ट्रराजकारण #Bhagwangad #KrishnaMaharajShastri #NamdevShastriMaharaj #GopinathMunde #PankajaMunde #MaharashtraNews #MarathiNews #KaryarambhDigital
महाराष्ट्राच्या संतपरंपरेत काही ठिकाणं अशी आहेत, ज्यांचं महत्त्व केवळ धार्मिक श्रद्धेपुरतं मर्यादित नाही. या ठिकाणांचा संबंध समाजाच्या जडणघडणीशी, शिक्षणाशी, सामाजिक परिवर्तनाशी आणि लाखो लोकांच्या भावविश्वाशी जोडलेला आहे. बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेवर पाथर्डी तालुक्यात असलेला श्रीक्षेत्र भगवानगड हे असंच एक महत्त्वाचं श्रद्धास्थान! भगवानगड म्हटलं की डोळ्यांसमोर येतात संत भगवान बाबा, त्यांची समाजप्रबोधनाची परंपरा, संत भीमसिंह महाराजांचं कार्य, महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराजांची शिस्त आणि दसर्याच्या दिवशी भरणारा गोपीनाथ मुंडे यांचा दसरा मेळावा. पण आज भगवानगड एका नव्या वळणावर उभा आहे. कारण जवळपास तेवीस वर्षे गडाची धुरा सांभाळणार्या नामदेव शास्त्री महाराजांनी आपल्या उत्तराधिकार्याची निवड केली आणि दसर्याच्या शुभमुहूर्तावर महंत कृष्णा महाराज शास्त्री यांच्याकडे गादीची जबाबदारी सोपवली. मुळचे तेलंगणातील असलेले कृष्णा महाराज सुमारे सतरा वर्षांपूर्वी भगवानगडावर आले होते. याच गडावर त्यांनी ज्ञानेश्वरीचं शिक्षण घेतलं. पुढे निरंजन संस्थान, एकनाथवाडी येथील महंत म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. आता त्यांच्याकडे भगवानगडाचे महंत म्हणून जबाबदारी आली आहे. चला या व्हिडिओत आपण भगवानगडाची संपूर्ण सामाजिक, राजकीय, शैक्षणिक जडणघडण समजून घेऊ... कृष्णा महाराज यांचं आजपर्यंतचे कार्य, त्यांच्यावर भविष्यकाळात असलेली आव्हानं हे समजून घेण्याचा प्रयत्न करू....
🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा:
Instagram
https://www.instagram.com/karyarambh?...
💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k...
📢 Telegram Channel:
https://t.me/karyarambhbeed
⚠️ सूचना
या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही.
जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला
karyarambhbeed@gmail.com
(विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.