मऊसुत चटपटीत दहीवडे
माझं स्वयंपाक घर अस्सल मराठमोळी चव
0:00 / 0:00
मऊसुत चटपटीत दहीवडे
64 просмотра · 2 года назад
माझं स्वयंपाक घर अस्सल मराठमोळी चव
299 подписчиков
64 просмотра · 2 года назад
मऊसूत चटपटीत दहीवडे
#माझं स्वयंपाक घर अस्सल मराठमोळी चव
#दहीवडे रेसिपी
#मऊ सुत चटपटीत दहीवडे
#चटपटीत दहीवडे
साहित्य=दोन वाटी उडदाची डाळ भिजवलेली, वडे तळण्यासाठी तेल, 750 ग्रॅम दही, 150 ग्रॅम साखर, चवीनुसार मीठ, चिंच, एक वाटी साखर, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, अर्धा इंच आलं दोन ते तीन लसूण पाकळ्या, अर्ध्या लिंबाचा रस, व पाणी.
कृती=सर्वात आधी डाळ सात ते आठ तास व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे व चाळणी मध्ये टाकून तिचे सर्व पाणी काढून टाकायचे आहे व मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे गरज पडल्यास थोडसं पाणी टाकू शकता पण बॅटर घट्टच ठेवायचा आहे,. हे मिश्रण आता एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या त्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची, किसलेलं आलं, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा जिरे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या व एक 15 ते 20 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्या.
चिंचेची चटनी=चिंच अर्धा तास भिजवून घ्यायची आहे व मिक्सरच्या जारमध्ये चीज व साखर थोडसं चिमूटभर मीठ, अर्धा चमचा बडीशोप टाकून हे वाटून घ्यायचा आहे. तिला एका चाळणीमधून गाळून घ्यायची आहे.. आपली चिंचेची चटणी तयार आहे.
पुदिन्याची चटणी=अर्धा वाटी स्वच्छ साफ करून धुतलेला पुदिना, पाव वाटी कोथिंबीर, दोन ते तीन हिरवी मिरची, दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, चवीपुरतं मीठ व एक अर्ध्या लिंबाचा रस हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली पुदिन्याची चटणी तयार आहे.
आता आपण पसरट एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचा आहे. व तोपर्यंत आपलं डाळीचं जे वाटण आपण करून ठेवलं आहे ते आपण एक ते दोन ते तीन मिनिटांसाठी सतत फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये हवेचे बबल्स तयार होतील व आपलं बॅटरीचे आहे ते छान नरम व फ्लफी होईल.. एका प्लेटमध्ये वडे करण्यासाठी हाताला लावण्याकरिता पाणी घ्यायचा आहे , तसेच एका डब्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे डबा भरून त्याच्यामध्ये आपले दहीवडे जे आपण तळणार आहे ते तळून झाले की लगेच त्या थंड पाण्यात आपल्याला टाकून द्यायचे आहे.
आता आपलं बॅटर तयार आहे, व आपलं तेलही तयार आहे गरम झालेला आहे, आता आपण हाताला पाणी लावून घ्यायचा आहे व आपल्याला हव्या त्या आकारामध्ये वडे तयार करून तेलामध्ये सोडायचे आहे व कमी गॅस वरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आहे. व काढून लगेच त्याला थंड पाण्यामध्ये टाकायचे आहे एक 10 मिनिटे त्याला तसंच ठेवायचं आहे
एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात दही काढून घ्यायचा आहे व छान फेटून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर टाकून घ्यायची आहे व साखर विरघळेपर्यंत दही फेटून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये टाकलेले दहीवडे आता पाण्यातून काढून घ्यायचे आहे व ते हलक्या हाताने दाबून ते आपल्याला दही मध्ये बुडवून ठेवायचे आहे..
आता सर्व्ह करताना सर्वात आधी प्लेटमध्ये दही मध्ये बुडालेला दहीवडा ठेवून घ्या त्यावरती थोडसं दही टाकून घ्या मग त्यावर चिंचेची चटणी टाकून घ्या व पुदिन्याची चटणी टाकून घ्या. नंतर त्यावरती लाल मिरची पावडर भुरभुरून घ्यायची आहे तसेच जिरे पावडर टाकून घ्यायची आहे व चवीनुसार थोडसं सैंधव मीठ वरतून शिंपडायचे आहे व तुमच्याकडे शेव असेल तर तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे आपले दहीवडे तयार झालेले आहे.
जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद
#दहिवडे रेसिपी
#न्यू रेसिपी