Mahuli Fort Trek | माहुली किल्ला | A to Z details | Vlog 01
GURU CHYA PAIVATA
0:00 / 0:00
Mahuli Fort Trek | माहुली किल्ला | A to Z details | Vlog 01
12 285 просмотров · 4 г. назад
GURU CHYA PAIVATA
309 подписчиков
12 285 просмотров · 4 г. назад
Mahuli fort trek | माहुली किल्ला | A to Z details | First Vlog
.
Contact for inquiry 👇🏻
Vilas thakare :- 93099 12730
.
माहुलीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक १९ मार्च, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. [१] आसनगाव या रेल्वे स्थानकापासून हा किल्ला ५ कि.मी. अंतरावर आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे बराच काळ वास्तव्य होते असे सांगितले जाते. किल्ल्याजवळून भारंगी नदी वाहते. ही नदी भातसई नदीची उपनदी आहे
ठाणे जिल्ह्यात असणारा माहुली किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1661 मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला होता. पुरंदरच्या तहात तो पुन्हा मुघलांकडे गेल्यावर सन 1670 मध्ये मोरोपंतांनी तो परत जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शंभुराजेंच्या काळात मराठ्यांचे किल्ले लढून जिंकता येत नसल्याने औरंगजेबाने ते फितुरीने जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला. माहुली किल्ला फितुरीने घेण्यासाठी मुघल सरदार मातबरखान याने माहुलीचा किल्लेदार द्वाराकोजी याचे मन वळवण्यासाठी नरसु महाडिक याला मध्यस्थ नेमले.त्याच्या प्रयत्नाने किल्लेदार द्वाराकोजी मुघल सरदार अब्दुल कादिर याला भेटला आणि म्हणाला की साल्हेरचा किल्लेदार असोजी प्रमाणे मला मनसब दिली तर मी किल्ला खाली करीन आणि 40 हजार रुपये,10 घोडे, खिलत इनाम आणि राहण्यासाठी जुन्नर जवळची दोन गावे वतन दिली तर मी स्वतः दरबारात हजेरी देण्यासाठी येईन. माहुलीचा किल्लेदार द्वाराकोजी अब्दुल कादिराला भेटला ती तारिख होती 21 ऑगस्ट 1688.