🌿 कुरकुरीत ज्वारीचा डोसा | Instant Crispy Jowar Dosa
RecipeLogic
0:00 / 0:00
🌿 कुरकुरीत ज्वारीचा डोसा | Instant Crispy Jowar Dosa
118 просмотров · 2 недели назад
RecipeLogic
438 подписчиков
118 просмотров · 2 недели назад
🌿 कुरकुरीत ज्वारीचा डोसा | Instant Crispy Jowar Dosa
🌿 नमस्कार मैत्रिणींनो! 🙏
आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि जाळीसारखा ज्वारीचा डोसा
रवा आणि तांदळाचे पीठ वापरल्यामुळे डोसा छान crispy होतो. सोबत बनवा स्वादिष्ट हिरवी नारळाची चटणी. 🥥🌿
🥣 Ingredients | साहित्य
बॅटरसाठी
ज्वारीचे पीठ – 1 कप
रवा – 4 टेबलस्पून
तांदळाचे पीठ – 4 टेबलस्पून
मीठ – चवीनुसार
काळी मिरी – 1 टीस्पून, कुटलेली
हिरवी मिरची – 4, चिरलेली
कढीपत्ता – एक मूठ, चिरलेला
कोथिंबीर – एक मूठ, चिरलेली
जिरे – 1 टीस्पून
दही – ¼ कप
पाणी – 3 कप
हिरव्या नारळाच्या चटणीसाठी
ताजा नारळ – 1 छोटा
कोथिंबीर – एक कप
पुदिना – 1/2 कप
कढीपत्ता – 1/2 कप
आले – 1 इंच
हिरवी मिरची – 2 चिरलेली
साखर – 1 टीस्पून
काळी मिरी – चिमूटभर, ताजी कुटलेली
भाजलेले शेंगदाणे – ½ कप
लसूण – ४ पाकळ्या
मीठ – चवीनुसार
जिरे – 1 टीस्पून
दही – ¼ कप
कांदा –1 कप चिरलेला
पाणी – आवश्यकतेनुसार
डोसा करण्यासाठी
तेल – आवश्यकतेनुसार
👩🍳 Method | कृती
एका मोठ्या भांड्यात ज्वारीचे पीठ, रवा, तांदळाचे पीठ, मीठ, काळी मिरी, हिरवी मिरची, कढीपत्ता ,कोथिंबीर ,दही आणि जिरे घाला.
सर्व साहित्य छान मिक्स करा.
त्यात 2 कप पाणी घालून सतत फेटा, म्हणजे बॅटरमध्ये गुठळ्या राहणार नाहीत.
आता आणखी 1 कप पाणी घालून पातळ आणि free-flowing batter तयार करा.
बॅटर झाकून 15 मिनिटे रेस्ट द्या.
🥥 हिरवी नारळाची चटणी
मिक्सरच्या भांड्यात नारळ, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता,आले, हिरवी मिरची, साखर, काळी मिरी, भाजलेले शेंगदाणे, मीठ, जिरे,लसूण पाकळ्या आणि दही घाला.
आवश्यकतेनुसार पाणी घालून जाडसर आणि थोडी भरड चटणी वाटून घ्या.
🫓 डोसा
बॅटरमध्ये १ चिमूट बेकिंग सोडा आणि १ कप बारीक चिरलेला कांदा घालून छान मिक्स करून घ्या.
नॉन-स्टिक पॅन किंवा सीझन केलेला तवा खूप गरम करा.
डोसा घालण्याआधी गरम तवा मीठ-साखरेच्या पाण्याने पुसून घ्या.
बॅटर थोड्या उंचीवरून कडेकडून गोलाकार पद्धतीने ओता.
बॅटर आपोआप पसरून सुंदर जाळीसारखा pattern तयार होईल.
कडेला थोडे तेल घालून 5 मिनिटे किंवा डोशाच्या कडा आणि जाळी सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत शिजवा.
स्पॅटुलाच्या मदतीने डोसा अलगद सोडवा.
फोल्ड करून हिरव्या नारळाच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा. 😋
💡 Recipe Logic Secret Tip
कुरकुरीत आणि जाळीसारखा ज्वारीचा डोसा बनवण्याचे मुख्य रहस्य म्हणजे तवा खूप गरम आणि बॅटर पातळ ठेवणे. 🔥
तवा पुरेसा गरम असेल तर बॅटर ओतल्याबरोबर जाळीसारखे pattern तयार होते आणि डोसा छान crispy होतो.
Jowar Dosa
Crispy Jowar Dosa
Instant Jowar Dosa
Jowar Dosa Recipe
Jowar Flour Dosa
Crispy Dosa Recipe
Healthy Dosa Recipe
Instant Dosa
Gluten Free Dosa
Millet Dosa
Jowar Recipes
Healthy Breakfast Recipe
Easy Breakfast Recipe
Dosa Recipe
Green Coconut Chutney
Coconut Chutney
ज्वारीचा डोसा
कुरकुरीत ज्वारीचा डोसा
ज्वारीच्या पिठाचा डोसा
ज्वारीची रेसिपी
#JowarDosa
#CrispyJowarDosa
#InstantJowarDosa
#JowarRecipe
#DosaRecipe
#CrispyDosa
#MilletRecipes
#HealthyBreakfast
#GlutenFreeDosa
#JowarFlour
#HealthyRecipe
#BreakfastRecipe
#CoconutChutney
#RecipeLogic
#ज्वारीचाडोसा
#कुरकुरीतज्वारीचाडोसा