Перейти к содержимому

🥗 हरभऱ्याची चटपटीत चाट | Chana Chaat

RecipeLogic

0:00 / 0:00

🥗 हरभऱ्याची चटपटीत चाट | Chana Chaat

103 просмотра · 2 недели назад
RecipeLogic
438 подписчиков
103 просмотра · 2 недели назад
🥗 हरभऱ्याची चटपटीत चाट | Chana Chaat नमस्कार मैत्रिणींनो! 🙏 आज आपण बनवणार आहोत एकदम चटपटीत, मसालेदार आणि खमंग हरभऱ्याची चाट. 😋 शिजवलेल्या हरभऱ्याला काश्मिरी तिखट, जिरेपूड, आमचूर, धणेपूड आणि काळ्या मिठाचा मसाला देऊन, जिरे, आल्याची पेस्ट आणि हिंगाची फोडणी दिली आहे. त्यानंतर कांदा, टोमॅटो, काकडी, उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून ही चाट तयार केली आहे. ❤️ ही चाट संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, हलक्या भुकेसाठी किंवा झटपट स्नॅकसाठी एकदम perfect आहे. 🥣 साहित्य हरभरे – 1 cup मीठ – चवीनुसार काश्मिरी लाल तिखट – 1 टीस्पून जिरेपूड – 1 टीस्पून आमचूर पावडर – 1 टीस्पून धणेपूड – 1 टीस्पून काळं मीठ – ½ टीस्पून तेल – 1 टेबलस्पून जिरे – ½ टीस्पून आल्याची पेस्ट – 1 टेबलस्पून हिंग – 1 चिमूट कांदा – 2, बारीक चिरलेले टोमॅटो – 2, बारीक चिरलेले काकडी – 1, बारीक चिरलेली हिरवी मिरची – 1 टीस्पून, बारीक चिरलेली कोथिंबीर – बारीक चिरलेली चाट मसाला – 1 टीस्पून आमचूर पावडर- 1 टीस्पून लिंबाचा रस – 1 टीस्पून उकडलेला बटाटा – 1, चिरलेला 👩‍🍳 कृती सर्वप्रथम काळे हरभरे 7–8 तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. भिजलेले हरभरे पाण्यातून काढून मीठ घालून कुकरमध्ये मऊ पण अख्खे राहतील असे शिजवून घ्या. आता एका बाऊलमध्ये काश्मिरी तिखट, जिरेपूड, आमचूर पावडर, धणेपूड आणि काळं मीठ घ्या. त्यामध्ये शिजवलेल्या हरभऱ्याचं थोडं पाणी घालून सर्व मसाले छान मिक्स करून घ्या. आता पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जिरे, आल्याची पेस्ट आणि हिंग घालून छान परतून घ्या. आता तयार केलेला मसाल्याचा मिक्स पॅनमध्ये घाला आणि मसाला छान परतून घ्या. मसाल्याला तेल सुटायला लागलं की शिजवलेले हरभरे घाला. आता हाय फ्लेमवर हरभरे मसाल्यासोबत चांगले मिक्स करत शिजवा, जोपर्यंत त्यातील पाणी पूर्णपणे आटत नाही. पाणी आटलं की गॅस बंद करा. हरभरे एका बाऊलमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्या. हरभरे थंड झाल्यावर त्यात कांदा, टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि उकडलेला बटाटा घाला. शेवटी 1 टीस्पून चाट मसाला,1 टीस्पून आमचूर पावडर आणि 1 टीस्पून लिंबाचा रस घालून सर्व साहित्य छान मिक्स करा. तयार आहे आपली चटपटीत आणि खमंग हरभऱ्याची चाट! 😋❤️ 💡 Recipe Logic / Secret मसाले आधी हरभऱ्याच्या शिजवलेल्या पाण्यात मिक्स करून तेलात परतल्यामुळे मसाला छान शिजतो आणि हरभऱ्याला व्यवस्थित coat होतो; शेवटी हाय फ्लेमवर पाणी आटवल्यामुळे चाट पाणचट न होता एकदम मसालेदार आणि flavourful होते. काळ्या हरभऱ्याची चाट काळा चणा चाट काळ्या चण्याची चाट हरभरा चाट रेसिपी चटपटीत चाट मसाला चना चाट हेल्दी चाट झटपट नाश्ता संध्याकाळचा नाश्ता हेल्दी स्नॅक्स घरच्या घरी चाट स्ट्रीट स्टाइल चाट चाट रेसिपी मराठी काळ्या हरभऱ्याची रेसिपी Black Chana Chaat Kala Chana Chaat Black Chickpea Chaat Healthy Chaat Recipe Easy Chaat Recipe Indian Chaat Protein Rich Snack #काळ्याहरभऱ्याचीचाट #काळाचणाचाट #हरभराचाट #चाटरेसिपी #चटपटीतचाट #मराठीरेसिपी #हेल्दीरेसिपी #झटपटरेसिपी #नाश्तारेसिपी #संध्याकाळचानाश्ता #हेल्दी स्नॅक्स #घरीचाट #स्ट्रीटस्टाइलचाट #BlackChanaChaat #KalaChanaChaat #ChaatRecipe #HealthyChaat #HealthySnacks #IndianFood #RecipeShorts #MarathiRecipes #ProteinRichSnack