जव्हार, ठाणे जिल्ह्यातील महाबळेश्वर #महाराष्ट्र #travelblogger
Anuj Marathi
0:00 / 0:00
जव्हार, ठाणे जिल्ह्यातील महाबळेश्वर #महाराष्ट्र #travelblogger
418 просмотров · 1 г. назад
Anuj Marathi
781 подписчик
418 просмотров · 1 г. назад
जव्हार संस्थान हे इसवी सन १३१६ पासून १० जून १९४८ पर्यंत अस्तित्वात होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे संस्थान मुंबई इलाख्यात विलीन झाले[१][२] जव्हार संस्थान हे ठाणे क्षेत्रातील हे एकमेव संस्थान होते. जव्हार संस्थानचे राजघराणे हे महादेव कोळी समाजाचे होते, त्यामुळे बोलीभाषेत महादेव कोळ्यांचे साम्राज्य - जयहर असे पण म्हणले जाते. या संस्थानचे शेवटचे राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे हे होते.
जव्हार हे शहर पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याचे मुख्य ठिकाण/शहर आहे. ठाणे शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर हे थंड हवेचे ठिकाण आहे. ह्याला ठाणे जिल्ह्याचे ’महाबळेश्वर’ असे सुद्धा म्हणतात.[१] येथे जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला `शिरपामाळ, सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळणारे `सनसेट पॉइंट आणि येथील आदिवासींची संस्कृती जवळून पाहावयास मिळते. या ठिकाणाला ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे.
Music:Youth
Musician:Ikson
Site:https://studio.youtube.com/
License:https://ikson.com/music?q=&genre=0&vi...