ढाबा स्टाईल छोले ची भाजी, अशी बनवली की सगळ्यांनी काही मिनिटातच संपवली. Dhaba style chole recipe
mayuri bhamare
0:00 / 0:00
ढाबा स्टाईल छोले ची भाजी, अशी बनवली की सगळ्यांनी काही मिनिटातच संपवली. Dhaba style chole recipe
135 просмотров · 12 дней назад
mayuri bhamare
207 подписчиков
135 просмотров · 12 дней назад
ढाबा स्टाईल छोले ची भाजी
साहित्य
छोले -1 वाटी
कांदा -2
खोबरे -1 मोठा तुकडा
लसूण -7-8 पाकळ्या
आलं - अर्धा इंच
कोथंबीर
काळा मसाला -1.5 टेबलस्पून
लाल तिखट -1 टेबलस्पून
हळद - पाव टेबलस्पून
मीठ चवीनुसार
छोले 6-7 तास पाण्यात भिजवायचे. त्यानंतर कुकर मध्ये 5 शिट्ट्या करून छोले शिजवून घ्यायचे. भाजी साठी वाटण बनवण्यासाठी 2 कांदे उभे चिरून ते कढई मध्ये भाजून घ्यायचे व छोटा खोबऱ्याचा तुकडा किसून ते सुद्धा भाजून घ्यायचा. आता भाजलेले कांदा, खोबरे, आलं,लसूण आणि कोथिंबीर याचे वरण करून घ्यायची. कढई मध्ये तेल टाकून वाटण घालून परतून घ्यायचे. वाटण परतून झाल्यावर मसाले घालायचे व मसाले सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. आता शिजलेले छोले घालायचे.चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. भाजी दाटसर होण्यासाठी त्यामध्ये दोन उकडलेले बटाटे चुरून घालायचे, कोथिंबीर घालायची.छान अशी ढाबा स्टाईल छोले ची भाजी तयार आहे.