Historical Ahilyanagar | मराठेशाहीचा शेवटचा लढवय्या नगरचा होता, पहा 'हा' गौरवशाली इतिहास...
Ahilyanagarlive24
0:00 / 0:00
Historical Ahilyanagar | मराठेशाहीचा शेवटचा लढवय्या नगरचा होता, पहा 'हा' गौरवशाली इतिहास...
38 685 просмотров · 8 дней назад
Ahilyanagarlive24
117 тыс. подписчиков
38 685 просмотров · 8 дней назад
अहिल्यानगर… म्हणजेच ऐतिहासिक अहमदनगरची ही पवित्र भूमी..! ही भूमी केवळ संतांची नाही, तर शत्रूचा थरकाप उडवणाऱ्या शूरवीरांची आहे. ही तीच माती आहे, जिथं चांदबिबीने मुघल सम्राट अकबराला गुडघ्यावर आणले होते. ही तिच भूमी आहे, जिथं क्रुर औरंगजेब कायमचा मातीत गाडला गेला. ही तिच भूमी आहे, जिथं हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती माणकोजी दहातोंडे जन्मले..! पण... याच मातीनं, १९ व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजी सत्तेला असा एक दणका दिला, ज्याची नोंद ब्रिटिश पार्लमेंटलाही घ्यावी लागली... एका अशा योद्ध्याची ही कहाणी आहे, ज्याला पकडण्यासाठी बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला मराठ्यांचे दोन-दोन किल्ले ओलीस ठेवावे लागले होते. तो योद्धा म्हणजे… निमगाव जाळीचे 'सरदार त्रिंबकजी डेंगळे'! होय, भारताच्या इतिहासात, राजासाठी, राजकुमारांसाठी, किल्ले ओलिस ठेवण्याची अनेक उहादरणे दिसतात. परंतु, इतिहासात पहिल्यांदाच एका सामान्य सैनिकासाठी ब्रिटीशांनी पेशव्यांचे दोन किल्ले ओलिस ठेवले होते. आज निमगाव जाळीच्या याच शूरवीर त्र्यिंबकजी डेंगळे यांच्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. नगरचा इतिहास किती जाज्वल्यशील आहे, हे आपल्याला या व्हिडीओतून समजणार आहे. त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #