मस्त खुसखुशीत आणि खमंग अशी शेगावची सुप्रसिद्ध कचोरी घरच्या घरी बनवा | Leena's Sugrankatta
Leena's Sugrankatta
0:00 / 0:00
मस्त खुसखुशीत आणि खमंग अशी शेगावची सुप्रसिद्ध कचोरी घरच्या घरी बनवा | Leena's Sugrankatta
4 719 просмотров · 2 года назад
Leena's Sugrankatta
53,1 тыс. подписчиков
4 719 просмотров · 2 года назад
#शेगावकचोरी #कचोरी #सुप्रसिद्धकचोरी #स्नॅक्स #शांभवीकिचन #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
शेगाव कचोरी
पारी साठी:
2 कप मैदा,
पाव टी स्पून मीठ,
पाव कप मोहन थंड तेल/तूप
अर्धा कप पाणी.
सारणासाठी साहित्य:
प्रत्येकी 1 टी स्पून धणे, जिरे, बडीशेप यांची जाडसर भरड.
6 मिरच्या,अर्धा इंच आले,15 लसूण पाकळी यांची जाडसर पेस्ट.
बेसन १ वाटी
फोडणी:
3 टेबल स्पून तेल,
1 टीस्पून मोहरी,
1 टीस्पून जिरे,
पाव टीस्पून हिंग
इतर साहित्य :
पाव टीस्पून हळद,
पाव टीस्पून तिखट,
अर्धा चमचा मीठ,
1 टीस्पून धणे पूड,
अर्धा टीस्पून जिरे पूड,
अर्धा चमचा आमचूर,
अर्धा चमचा गरम मसाला
तळण्या साठी तेल.
कृती:
प्रथम पारीचे साहित्य मैदा,तूप/तेल ,मीठ एकत्र करून लागेल तसे पाणी घालून जरासा घट्ट गोळा मळून घ्यावा. 20 मिनिट रेस्ट द्यावी. आता जिरे,धणे,बडीशेप जाडसर कुटून पुड करून ठेवावी.त्यानंतर मिरची,आले,लसूण याचीही जाडसर पेस्ट करून ठेवावी.गॅस वर कढई ठेवून गॅस सुरू करावा.त्यात तेल टाकावे.तेल चांगले तापले की मोहरी,जिरे घालून फोडणी करून घ्यावी.गॅस कमी करून त्यात वाटण घालून चांगले परतावे.वाटण परतून झाले की जिरे,बडीशेप,धणे पूड परतून घ्यावे. आता त्यात बाकीचे सर्व मसाले टाकावे व पुन्हा परतावे. तेल सुटू लागले की त्यातच बेसन पीठ टाकून परतावे. बेसन खमंग भाजून झाले की पाण्याचा हबका देत दणदणीत वाफ आणून मिश्रण फार कोरडे नाही फार ओलसर नाही इतपत ठेवावे.गॅस बंद करावा.
आता पारीच्या मिश्रणाचे 12 गोळे करून घ्यावेत. तसेच जेव्हढा पारीचा गोळा त्याच्या निम्मा सारणाचा गोळा असे सर्व गोळे तयार करून ठेवावेत. हातानी मैद्याच्या गोळ्याला खोलगट आकार देऊन त्यात सारण गोळा भरावा.पारी हलक्या हाताने घट्ट बंद करून लहान चेंडू एव्हढा गोळा करावा. गोळा हाताने दाबून किंवा पोळपाटावर ठेवून दाब देऊन जाड पुरी सारखी कचोरी करून घ्यावी. आकार तळहात एव्हढा असावा. सर्व कचोरी करून घ्या. कढई मंद गॅस वर ठेवून त्यात तेल तापत ठेवा. तेल अगदी हलके गरम हवे.त्या तेलात बसतील तेव्हढ्या कचोरी सोडा. कचोरी 10 ते 12 मिनिटांनी वर येईल. मगच ती उलटपालट करावी. गॅस मंद असावा. अश्या रीतीने सर्व कचोरी तळून घ्यावी.कचोरी तळायला सुमारे 35 ते 40 मिनिट लागू शकतात. डार्क ब्राऊन रंग आला की कचोरी काढून घ्याव्यात.
गरमागरम कचोरी चिंचगुळाची चटणी किंवा कोथिंबीर पुदिना च्या चटणीबरोबर खावयास द्याव्यात.
दिवाळीचा फराळ, केळा वेफर्स, शंकरपाळी , शेगाव कचोरी वा अन्य पदार्थांच्या ऑर्डर साठी खालील नंबरवर संपर्क करावा.
शांभवी किचन
श्री. विनोद गोडसे
कसबा पेठ, पुणे.
+91 98220 63183
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040