असे जगावे! | आनंदी आयुष्याचं रहस्य | दिलीप गुणे | कोल्हापूर | ऐसपैस
Aispais
0:00 / 0:00
असे जगावे! | आनंदी आयुष्याचं रहस्य | दिलीप गुणे | कोल्हापूर | ऐसपैस
12 015 просмотров · 5 дней назад
Aispais
253 подписчика
12 015 просмотров · 5 дней назад
प्रत्येक माणसाची एक गोष्ट असते. ऐसपैसच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या माणसांच्या गोष्टी, अनुभव, प्रवास, संघर्ष, विचार आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐकून, त्यांच्या गोष्टींची उकल करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आयुष्य आनंदाने आणि समृद्धपणे कसं जगावं? बदलत्या काळात आपली पाळंमुळं, संस्कार आणि माणुसकी कशी जपावी? या प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा ऐसपैस संवाद दिलीप गुणे यांच्यासोबत!
पाच पिढ्यांचा आयुर्वेदाचा समृद्ध वारसा, मॅन्युफॅक्चरिंगमधील ४५ वर्षांचा अनुभव आणि मार्केटिंगमधील ५५ वर्षांचा अनुभव अशा समृद्ध प्रवासातून आलेले विचार, आठवणी आणि जीवनदृष्टी जाणून घेऊया.
या गप्पांमध्ये आपण बोलणार आहोत:
• दिनचर्या, शिस्त आणि निरोगी जीवनशैली
• जुन्या कोल्हापूरच्या आठवणी आणि बदलता काळ
• संस्कार, समाधान, संयम आणि सहनशीलता
• दुःखाकडे सकारात्मकतेने पाहण्याची कला
• सुख म्हणजे नक्की काय आणि वर्तमानात कसं जगावं?
• कान आणि डोळे उघडे ठेवून जगाकडे पाहण्याची कला - The Art of Noticing
• माणसं जोडण्याचं महत्त्व आणि नात्यांमधून मिळणारी समृद्धी
• आयुष्यात छंदांचं स्थान
• आयुर्वेद, प्रोबायोटिक्स आणि अध्यात्म यांचं नातं
• पैसा आणि प्रसिद्धीपलीकडे यशाची खरी व्याख्या
हा केवळ एक मराठी पॉडकास्ट नाही, तर आयुष्य समजून घेण्याचा, अनुभवांतून शिकण्याचा आणि माणसांशी जोडलं जाण्याचा एक प्रयत्न आहे.
तुम्हाला ह्या गप्पांमधलं काय काय भावलं? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही गुणे काकांना भेटला असाल, तर त्यांच्याबद्दलचे तुम्हाला भावलेले प्रसंग आमच्यासोबत शेअर करा!
अशाच ऐसपैस गप्पांसाठी चॅनेलला Subscribe करा आणि हा भाग तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा.
#Aispais #MarathiPodcast #MarathiMotivation #MarathiStories #LifeLessons #Ayurveda #MarathiVichar #असेजगावे #दिलीपगुणे
Credits:
Venue Partner - Pais Agro Tourism, Kolhapur
Pais Instagram - / paisagrotourism
Connect with us:
Instagram: / aispais_adhikrut
Email: aispais.adhikrut@gmail.com