विश्वातील सहावी दुर्गा श्री. कात्यायनी देवी मंदिर , कोल्हापूर | Anandi Anand
Anandi Anand
0:00 / 0:00
विश्वातील सहावी दुर्गा श्री. कात्यायनी देवी मंदिर , कोल्हापूर | Anandi Anand
2 014 просмотров · 4 года назад
Anandi Anand
15,8 тыс. подписчиков
2 014 просмотров · 4 года назад
महालक्ष्मीच्या विविध रुपातील एक देवी म्हणून कात्यायनी देवीचा उल्लेख करवीर खंडातील 'पद्मपुराणा'त उल्लेख आहे. घनदाट जंगल असताना राजर्षी शाहू महाराज येथे शिकारीसाठी नियमीतपणे येत होते. कळंबा तलावाच्या बांधल्यानंतर कळंबा व बालिंगा गाव स्थलांतरीत करण्यात आले. यामुळे बालिंगा आणि कळंबा गावातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी भाविक येथे येतात. मंदिराच्या विकासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व कात्यायनी मंदिर ट्रस्ट प्रयत्नशील आहे.
कात्यायनी मंदिरामध्ये दर अमवस्येला महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्रिपुरारी पोर्णिमेला मोठा दीपोत्सव साजरा केला जातो. देवीच्या भंडारा यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. नवरात्रोत्सवात नऊ दिवस भाविक निवास करतात. येथे सुमारे १५० ते २०० भाविकांची व्यवस्था केली जाते. पहिले तीन दिवस पूर्ण उपवास केला जातो. चौथ्या दिवसी फळे उपवासकांना दिली जातात. नंतर प्रत्येक दिवशी दुपारी १२ ते २.३० वेळेत फळे, खिचडी, दही, दुधाचा वापर फराळात केला जातो.
कोल्हापूर पासून अंतर - ९ की.मी.
जवळचे प्रसिद्ध देवस्थान - संत श्री. बाळूमामा मंदिर , आदमापुर ( ३५ कि.मी. )