Перейти к содержимому

बदलत्या जागतिक सुरक्षा व्यवस्थेत भारताच्या संरक्षण दलांत मोठे बदल – राजनाथ सिंह

DD Sahyadri News

0:00 / 0:00

बदलत्या जागतिक सुरक्षा व्यवस्थेत भारताच्या संरक्षण दलांत मोठे बदल – राजनाथ सिंह

527 просмотров · 1 день назад
DD Sahyadri News
1,5 млн подписчиков
527 просмотров · 1 день назад
जगातील आणि शेजारील देशांमधील घडामोडींवर भारताचे बारकाईने लक्ष असून, आधुनिक युद्धपद्धती आणि जागतिक सुरक्षा व्यवस्थेतील बदलांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या संरक्षण दलांमध्येही महत्त्वपूर्ण बदल होत आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. जोधपूर येथे आयोजित ‘तरंग शक्ती २०२६’ या बहुराष्ट्रीय हवाई सरावादरम्यान ते बोलत होते. जुन्या जागतिक व्यवस्थेत वेगाने बदल होत असून, नव्या जागतिक व्यवस्थेचे स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे त्यांनी नमूद केले. ‘आत्मनिर्भर भारत’ म्हणजे जगापासून दूर राहणे नव्हे, तर संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे तंत्रज्ञान देशातच विकसित करणे, त्याची निर्मिती, देखभाल आणि सुधारणा करण्याची क्षमता वाढवणे हा त्यामागील उद्देश असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. भविष्यातील लष्करी सामर्थ्य केवळ सैनिकांच्या संख्येवर नव्हे, तर माहितीचे आकलन, निर्णयक्षमता आणि कृतीचा वेग यांवर अधिक अवलंबून असेल, असेही त्यांनी सांगितले. या सरावात भारतीय हवाई दलाच्या सारंग हेलिकॉप्टर पथकाने हवाई कसरती सादर केल्या. राफेल, एफ-३५ आणि एफ-१६ या लढाऊ विमानांनीही सरावात सहभाग घेतला. #RajnathSingh #TarangShakti2026 #IndianAirForce #DefenceModernisation #AtmanirbharBharat #MilitaryExercise #Rafale #F35 #F16 #Aerospace #NationalSecurity #DDSahyadriNews #SahyadriNews