Перейти к содержимому

Mutton Sukka Malvani Style | viral video| foodie

AswadByGauri

0:00 / 0:00

Mutton Sukka Malvani Style | viral video| foodie

601 просмотр · 11 дн. назад
AswadByGauri
259 подписчиков
601 просмотр · 11 дн. назад
झणझणीत आणि चवदार मटण सुक्का बनवण्याची सोपी रेसिपी खालीलप्रमाणे आहे साहित्य (Ingredients) • मटण: १००० ग्रॅम (स्वच्छ धुवून घेतलेले) • हळद: पाव टीस्पून • तेल: ३ टेबलस्पून • कांदा: 4 मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला) • आले-लसूण पेस्ट: १ टेबलस्पून ( ५ लसूण पाकळ्या, २ इंच आले) • मीठ: चवीनुसार • तूप : १ चमचे • तेल : ४ चमचे • मालवणी मसाला : २ टेबलस्पून • एव्हरेस्ट मटण मसाला : २ टेबलस्पून (एव्हरेस्ट मटण मसाला किंवा उपलब्ध असलेला इतर कोणताही मीट मसाला.) • मालवणी वाटण : २ टेबलस्पून • फोडणीसाठी खडे मसाला: काळी मिरी ,लवंग ,दालचिनी ,तमालपत्र (तेजपत्ता) ,चक्रीफूल • कोथिंबीर: बारीक चिरलेली कृती (Step-by-Step Instructions) मटण स्वच्छ धुवून घ्या आणि मटणाला हळद लावून १५-२० मिनिटे मॅरीनेट करायल बाजूला ठेवा 1. मटण शिजवून घेणे: o त्यानंतर कुकरमध्ये २ चमचे तेल गरम करून २ बारीक चिरलेला कांदा आले-लसूण पेस्ट आणि मटण घालून चांगले परतून घ्या. o मग आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून कुकरला ७ ते ८ शिट्ठी काढून मटण मऊ शिजवून घ्या (मटण पूर्ण शिजले पाहिजे). 2. मटण सुक्का फोडणी: o एका कढईत किंवा पॅनमध्ये १ चमचे तूप व २ चमचे तेल गरम करा. o नंतर त्यात खडे मसाला, २ बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून त्यात मालवणी मसाला ,हळद मिक्स करून घ्या. o मग तयार केलेले मालवणी कांदा खोबरे वाटण परतून चांगले तेल सुटेपर्यंत कढईवर झाकण ठेवून ५-७ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. o आता शिजवलेले मटण मसाल्यामध्ये टाका आणि चांगले मिक्स करून. o त्यात चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून २ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. o वरून एव्हरेस्ट मटण मसाला व बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवा आणि चांगले मिक्स करून. झणझणीत मटण सुक्का तयार आहे! हा बेत गरम-गरम भाकरी, चपाती किंवा अल्नी भात ससोबत अप्रतिम लागतो. अधिक माहितीसाठी तुम्ही Aswadbygauri पाहू शकता.