प्रेमसुमनांजली - प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे
SADGURUBODH
0:00 / 0:00
प्रेमसुमनांजली - प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे
5 629 просмотров · 7 месяцев назад
SADGURUBODH
14,7 тыс. подписчиков
5 629 просмотров · 7 месяцев назад
प्रेमसुमनांजली
भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु मातु:श्री सौ.शकुंतलाताई आगटे यांच्या अलौकिक स्वरूपाचे, अद्भुत विभूतिमत्त्वाचे आणि अपूर्व, अद्वितीय अधिकाराचे यथार्थ वर्णन करणारी प.पू.सद्गुरु श्री.दादांची अप्रतिम रचना म्हणजेच 'प्रेमसुमनांजली' होय !
आज माघ कृष्ण सप्तमी, प.पू.सद्गुरु सौ.ताईंच्या सप्तम पुण्यतिथीच्या पावन दिनी अत्यंत सुरेल स्वरातली प्रेमसुमनांजली सादर करीत आहोत. सोबत प.पू.सद्गुरु सौ.ताईंच्या अतीव मोहक भावछटा देखील आपल्याला पाहायला मिळतील.
पुण्यतिथी निमित्त प.पू.सद्गुरु मातु:श्री सौ.ताईंच्या अम्लान श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत असोत !!
प्रेमसुमनांजली
जय जय वो प्रेमळे ।
श्रीकृष्णरसवेल्हाळे ।
निजभक्तप्रतिपाळे ।
मातृमूर्ते ॥१॥
जय जय वो सुधन्ये ।
सद्गुरुराजकन्ये ।
गोपगोपांगनामन्ये ।
सौख्यमूर्ते ॥२॥
जय जय वो सुखदे ।
परमपतिप्रमदे ।
सकळगुणसंपदे ।
शांतिमूर्ते ॥३॥
जय जय वो राधिके ।
प्रपंचभ्रमछेदिके ।
स्वात्मसुखवर्धिके ।
भक्तिमूर्ते ॥४॥
जय जय वो सुनंदे ।
श्यामरतिवरकंदे ।
परापरिश्रुतछंदे ।
रासमूर्ते ॥५॥
जय जय वो अमृते ।
गोपालहृदयस्थिते ।
दया पांघुरवी माते ।
विश्वमूर्ते ॥६॥
रचना - प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे
संगीत व गायनसेवा - श्री.श्रेयस पाटील.
निर्मिती - सद्गुरुबोध परिवार.
#bhaktimarg #shireeshdadakawade #शिरीषदादाकवडे #sadhana #शकाताईआगटे #पुण्यतिथी #प्रेम #प्रेम_भक्ति