Перейти к содержимому

मँगलोर ट्रेन एसी डब्यातून कोकणात गेले | रत्नागिरी स्टेशनचा सुंदर कायापालट|#indian railway#konkan

Geeta Haldankar

0:00 / 0:00

मँगलोर ट्रेन एसी डब्यातून कोकणात गेले | रत्नागिरी स्टेशनचा सुंदर कायापालट|#indian railway#konkan

2 787 просмотров · 1 год назад
Geeta Haldankar
17,3 тыс. подписчиков
2 787 просмотров · 1 год назад
मँगलोर ट्रेन एसी डब्यातून कोकणात गेले | रत्नागिरी स्टेशनचा सुंदर कायापालट|#indian railway#konkan मला नेहमी एसी चे तिकीट मिळत नाही पण यावेळी मला तत्काळ मध्ये एसी चे तिकीट मिळाले त्यासाठी नेहेमी एसी चे तिकीट ज्या दरात मिळते त्याच्या दुप्पट पैसे मोजावे लागले. मँगलोर ट्रेन चा time सी एस टी स्टेशन वरून रात्री 9 वाजून 50 मिनटने होता. मुंबई ते मँगलोर ही सुपरफास्ट ट्रेन आहे. ती ठाणे, पनवेल नंतर डायरेक्ट रत्नागिरी स्टेशन घेते. आणि पहाटे रत्नागिरीला साडे चार या दरम्यान पोहोचते. ट्रेन नेहेमी वेळेवर सुटते. या ट्रेन ला दादर ला हॉल्ट नाही. मी राहते वरळी गावात त्यामूळे मला सी एस टी स्टेशन ला जावे लागणार होते. त्यातच नवरात्रौत्सव मुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी होती मला वरळी गावात टॅक्सी मिळत नव्हती सर्वजण टॅक्सी चालक दादर स्टेशनला जायचं म्हटल्यानंतर नकार देत होते. मी जास्त पैसै द्यायला ही तयार होते तरीही कुणी तयार नव्हतं. मी सामानासह चालत चालत सेंच्युरी बाजार पर्यन्त येऊन पोहोचले. रात्रीचे 8 वाजून गेले होते. एक टॅक्सी चालक दादर ला जायला तयार झाला पण टॅक्सीत बसल्यानंतर तो ही सांगू लागला की मी तुम्हाला परेल स्टेशनला सोडतो. तूम्ही पण अडकाल ट्रॅफिक मुळे आणि मी ही अडकेन. शेवटी मी परेल स्टेशनला गेले. उतरल्या नंतर ही मला बरंच चालावं लागलं. परेल स्टेशनला गेल्यानंतर तिथे ही ट्रेन उशीरा धावत होत्या. शेवटी मला सी एस टी ला जायला ट्रेन मिळाली. मी मँगलोर ट्रेनच्या वेळे आधी पोहोचले. पण मँगलोर ट्रेन पकडल्यानंतर मात्र माझा प्रवास अतीशय सुखदायक झाला कारण माझं एसी तिकीट होतं. मस्त एग बिर्यानी ऑर्डर केली, मग स्टँड ला मोबाईल लावून apple 🍎 खात खात टी व्ही वरील मराठी मालिका पाहिल्या. ए सी डब्यात आपलयाला विक्रेत्यान शिवाय कुणाचाही आवाज ऐकायला येत नाहि अगदी बाहेरच्या त्ट्रेन विषयी अनाउन्समेंट चां आवाजही ऐकायला येत नव्हता. त्यामूळे मला काळजी वाटत होती. मी सकाळी 3 चा alarm लावला. चिपळूण स्टेशन येऊन गेलेले मला कळलंच नाही त्यामूळे मी लक्ष ठेवलं की कधी रत्नागिरी स्टेशन येतंय. माझ्या प्रमाणे काही प्रवासी ना रत्नागिरी स्टेशन ला उतरायचं होतं. सकाळी 4 वाजून 40 मिनटे वाजता रत्नागिरी स्टेशन आलं. मी रत्नागिरी स्टेशनला लिफ्ट ने वरती गेले आणि काय एकदम surprised झाले.रत्नागिरी स्टेशनचा पुर्णपणे कायापालट झाला. अतीशय सुंदररित्या सुशोभित केलंय रत्नागिरी स्टेशन. आरामदायी वेटींग रूमची पण ईथे लवकरच व्यवस्था होणार आहे मी जून्या वेटींग रूम मध्यें थांबले. सकाळी फ्रेश होऊन स्टेशन पासुन जवळच असणाऱ्या रेस्टॉरंट मध्ये मेदू वडा आणि कॉफी असा नाष्टा केला. मग रिक्षा ने रत्नागिरी कोर्टात गेले. मॅटर संपे पर्यंत उशीर झाला. आणि तो पर्यन्त माझा mobile ही बंद झाला.रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवस विजांच्या कडकडाटसह पाऊस पडल्याने ठीक ठिकाणी विजा पडल्या आणि इलेक्ट्रिसिटी बंद त्यामूळे कोर्टातही मला मोबाईल चार्जिंग करायला मिळाला नाही. संध्याकाळी उशीरा light आली. असा माझा प्रवास झाला. #indian_railway #mumbai_to_manglore_superfast_train #konkan_railway #kokan_railway #travel_vlog #ratnagiri_court #todays_train_incident #yesterdays_train_incident #konkan_railway #superfast_train