Перейти к содержимому

Maharashtra Student Council Election | 33 वर्षांनी विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू करण्यावर भर का?

Mumbai Tak

0:00 / 0:00

Maharashtra Student Council Election | 33 वर्षांनी विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू करण्यावर भर का?

3 433 просмотра · 2 дн. назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
3 433 просмотра · 2 дн. назад
Maharashtra | 33 वर्षांनी विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू करण्यावर भर का? | Student Council Election महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषद निवडणुका (Student Council Elections) पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विद्यार्थ्यांनी शेवटचं थेट मतदान १९९३ मध्ये केलं होतं. तब्बल ३३ वर्षांनंतर राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निवडणुकांचा आराखडा तयार करण्यासाठी १२ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुहास पेडणेकर आहेत. यापूर्वी कॅम्पसमधील हिंसाचार, राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासनाशी संबंधित कारणांमुळे विद्यार्थी निवडणुकांवर निर्बंध आले होते. २०१६ मध्ये निवडणुका पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला, २०१८ मध्ये नियमावली तयार झाली आणि २०१९ मध्ये निवडणुकांची तयारीही झाली; मात्र त्या पुढे ढकलण्यात आल्या. आता नव्या समितीसमोर शांततापूर्ण, पारदर्शक आणि विद्यार्थीकेंद्रित निवडणूक प्रक्रिया तयार करण्याचं आव्हान आहे. बाह्य राजकीय हस्तक्षेप आणि निवडणुकांचं व्यापारीकरण रोखण्यावरही भर आहे. #MaharashtraStudentElections #bjp #abvp #nsui #StudentElections #UniversityElection #MumbaiTak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.