Rahata Fake Babas Cheat Woman | राहात्यात भोंदूंच्या ‘चमत्काराला’ बळी पडली महिला! चौघे ताब्यात..
SP 24 TAAS
0:00 / 0:00
Rahata Fake Babas Cheat Woman | राहात्यात भोंदूंच्या ‘चमत्काराला’ बळी पडली महिला! चौघे ताब्यात..
23 612 просмотров · 3 недели назад
SP 24 TAAS
375 тыс. подписчиков
23 612 просмотров · 3 недели назад
Rahata Fake Babas Cheat Woman | राहात्यात भोंदूंच्या ‘चमत्काराला’ बळी पडली महिला! चौघे ताब्यात ..
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात पैसे आणि सोन्याच्या वस्तू सिद्ध करून देतो, असा बनाव करत महिलेची तब्बल 45 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूंसह त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अवघ्या 24 तासांत जेरबंद केलंय.
राहाता शहरातील नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या इशिता गिफ्ट गॅलरीमध्ये बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास भगवे कपडे घातलेले दोन हिंदी भाषिक इसम आले. दुकानात महिला एकट्याच असल्याचा फायदा घेत त्यांनी सुरुवातीला दक्षिणा मागितली. महिलेने त्यांना दहा रुपये दिल्यानंतर या भामट्यांनी गल्ल्यातील पैसे आणि मौल्यवान वस्तू सिद्ध करून देण्याचा बनाव सुरू केला.
यानंतर त्यांनी महिलेला गल्ल्यातील पैसे बाहेर काढायला लावले आणि हातचलाखी करत तब्बल पाच हजार रुपयांची रोख रक्कम स्वतःच्या झोळीत लंपास केली. एवढ्यावरच न थांबता महिलेच्या हातातील पुष्कराज खडा असलेली सहा ग्रॅम वजनाची, सुमारे 40 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी देखील सिद्ध करून देण्याच्या बहाण्याने काढून घेतली आणि दोघांनी दुकानातून पोबारा केला.
फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेने राहाता पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींच्या छायाचित्रांच्या आधारे तपासाला वेग दिला. आरोपी रेल्वेने पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कोपरगाव रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला.
अखेर कोपरगाव रेल्वे स्थानकावरून या दोन भोंदूंसह त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. देवेन ओमनाथ, शिवा हरी नाथ, गोगानाथ लक्ष्मण नाथ आणि विनोद नाथ अशी या चौघांची नावे असून, हे सर्व मध्यप्रदेशातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
#sp24taas #fakebabaexpose #cheating #ahilyanagar #shirdinews #ahilyanagarnews #radhakrishnavikhepatil #sujayvikhepatil #shirdi #rahata