Перейти к содержимому

ऊस दराबाबत कारखान्यांनी ९ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्यावा; विखे पाटलांचे निर्देश

Ahilyanagar Pulse

0:00 / 0:00

ऊस दराबाबत कारखान्यांनी ९ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्यावा; विखे पाटलांचे निर्देश

15 686 просмотров · 2 дн. назад
Ahilyanagar Pulse
320 подписчиков
15 686 просмотров · 2 дн. назад
ऊस दराबाबत कारखान्यांनी ९ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्यावा; विखे पाटलांचे निर्देश अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस दराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी संघटना, ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाना प्रतिनिधी प्रथमच एकत्र आले. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांनी ऊस दर आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करून येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निर्देश विखे पाटील यांनी दिले. कारखान्यांतील वजनकाट्यांची तपासणी करण्यासाठी तहसीलदार आणि वैधमापनशास्त्र विभागाचे संयुक्त पथक नियुक्त करण्यात येणार आहे. या तपासणीवेळी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. राज्य सहकारी बँकेच्या धोरणानुसार जिल्हा बँकेचे धोरण निश्चित होईल. प्रशासकांशीही कारखान्यांना मदतीबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपमहापौर धनंजय जाधव, प्रादेशिक उपसंचालक (साखर) संजय गोंदे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.