Dhangar Reservation : Dhangad आणि Dhangar समाज एकच असल्याचा GR सरकार काढणार, कोर्टात टिकेल का ?
BolBhidu
0:00 / 0:00
Dhangar Reservation : Dhangad आणि Dhangar समाज एकच असल्याचा GR सरकार काढणार, कोर्टात टिकेल का ?
84 382 просмотра · 2 г. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
84 382 просмотра · 2 г. назад
#BolBhidu #dhangarreservation #dhangadi
राज्यातील निवडणूक जश्या जवळ येत चाललंय आहेत तसं आरक्षण हा विषय जास्त चर्चेत येताना दिसतोय. मराठा समाजापाठोपाठ आता धनगर समाजानेसुद्धा ST मध्ये त्यांचा समावेश करावा म्हणून आंदोलन सुरु केले होते. धनगर समाजाचा NT मध्ये समावेश केलेला आहे. आंदोलनामुळे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी धनगर आणि धनगड या जाती एकच असल्याचा शासन आदेश (जीआर) काढण्यासाठी तीन आयएएस अधिकारी आणि धनगर समाजाच्या पाच प्रतिनिधींची समिती नेमण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील.
हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि अन्य कुठल्याही समाजावर अन्याय करणारा नसेल, असे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. याचवेळी विधासभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी धनगर समाजाला आदिवासी आरक्षणातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमची ना नाही. पण आमच्यामधून त्यांना आरक्षण का? धनगर समाजाला आदिवासीतूनच आरक्षण देण्याचा हट्ट का? असा सवाल नरहरी झिरवाळ यांनी केला आहे. संपूर्ण विषय अकाय आहे हे समजून घेऊया
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/