Witness to Three Droughts | 88 वर्षांच्या आजोबाने सांगितली तीन दुष्काळांची भयावह कहाणी! 2026 Drought
SP 24 TAAS
0:00 / 0:00
Witness to Three Droughts | 88 वर्षांच्या आजोबाने सांगितली तीन दुष्काळांची भयावह कहाणी! 2026 Drought
67 519 просмотров · 3 дн. назад
SP 24 TAAS
375 тыс. подписчиков
67 519 просмотров · 3 дн. назад
Witness to Three Droughts | 88 वर्षांच्या आजोबाने सांगितली तीन दुष्काळांची भयावह कहाणी! 2026 Drought ..
1972 Drought, 2026 Drought, Maharashtra Drought, Three Droughts Survivor, 88 Year Old Farmer, Maharashtra Farmers, Drought in Maharashtra, Drought Crisis, Sukhdi During Drought, Employment Guarantee Scheme, Rural Maharashtra, Farmers Struggle, Drought History, Shirdi News, Ahilyanagar News, Drought Conditions 2026 ..
महाराष्ट्राच्या मातीने अनेक दुष्काळ पाहिलेत… पण १९७२ च्या दुष्काळाच्या जखमा आजही जुन्या पिढीच्या मनावर ताज्या आहेत! पावसानं पाठ फिरवली, शेतं ओस पडली, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आणि हाताला काम मिळणंही कठीण झालं… अशा भयावह परिस्थितीत अनेक कुटुंबांना सुकडीच्या घासानं आणि रोजगार हमीच्या कामानं जगण्याचं बळ दिलं!
आता २०२६ मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाला सामोरे जात आहेत. राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
आजचा दुष्काळ कदाचित १९७२ इतका भीषण वाटत नसेल; मात्र पाण्याची टंचाई, पिकांचं नुकसान आणि पुढील हंगामाची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. यंदा कसंबसं निभावून गेलं, पण पुढच्या वर्षीही पाऊस पडला नाही, तर जगायचं कसं? असा सवाल ८८ वर्षीय कचरू बंडू हराळे यांनी व्यक्त केला आहे.
तीन दुष्काळ जवळून अनुभवलेले कचरू हराळे आजही वयाच्या ८८ व्या वर्षी शेतात राबतात. बदललेली शेती, बदललेली परिस्थिती आणि तीन दुष्काळांतील फरक त्यांनी अनुभवले आहेत. त्यांच्या अनुभवातून उलगडणार आहे दुष्काळाच्या वेदनांचा, जगण्यासाठी केलेल्या संघर्षाचा आणि भविष्याच्या चिंतेचा वास्तवदर्शी पट!
#sp24taas #maharashtradrought #shirdinews #radhakrishnavikhepatil #ahilyanagar #shirdinews #ahilyanagarnews #shirdi #drought2026 #drought1972 #sujayvikhepatil