Maharashtra Drought 1972: जनावरं विकली, झाडांची पानं खाल्ली, 1972च्या दुष्काळात महाराष्ट्र कसा जगला?
BolBhidu
0:00 / 0:00
Maharashtra Drought 1972: जनावरं विकली, झाडांची पानं खाल्ली, 1972च्या दुष्काळात महाराष्ट्र कसा जगला?
144 819 просмотров · 14 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
144 819 просмотров · 14 часов назад
#BolBhidu #MaharashtraDrought1972 #Maharashtra
72 च्या दुष्काळात जनवाराची पेंड खाऊन जगलोय बाबा. तसल दिस पूना येवूनी बघ..1972 च्या दुष्काळाच्या आठवणीत रडणारे बळीनाना सांगतायेत की दुष्काळात खायला काहीच नव्हतं मग गावातल्या जाणत्या लोकांनी सगळ्या गावातल्या लोकांना मजूर म्हणून काम दिली आणि दोन टाईमच्या जेवणाची सोय झाली 72 च्या दुष्काळाने तीन पिढ्यांवर एकदम वार केला. त्या काळातल्या तरुण पिढीच्या हातात खडी फोडायच हातोडं आलं. आधी सातू, मका, उंबर.. झाडांची पान खाऊन जगायची पाळी आली. मग अमेरिकेत डुकराला टाकली जाणाऱ्या मिलोच्या ज्वारीची भाकरी ताटात आली. घरची रुखवतासारखी दावण रिकामी झाली. डबडब करणारी हीर काळ बनली. आणि 72 च्या दुष्काळाने महाराष्ट्रावर कधीही न भरून येणारी जखम केली. केवढी तर 30 हजार गांव दुष्काळी होती. 68% गावात चारा आणि पाण्याची भीषण टंचाई. दरडोई उत्पादन 114 किलो वरून 49 किलोवर आलं आणि राज्यात उपासमार सुरू झाली. जिथे माणसाची ही अवस्था तिथे जनावरांचे हाल जास्त झाले. अंदाजे 6.33 लाख बैल, 6.26 लाख गायी आणि 2.45 लाख म्हशी गमावल्या आणि 8 लाख जनावर कवडीमोल भावान विकावी लागली. आज 72 चा दुष्काळ जगलेल्या लोकांच्या कहाण्या ऐकू..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/