अशा नवीन पद्धतीने घरी बनवा रसदार लेअरवाली बालूशाही | Balushahi Recipe | Badusha | Khurmi
Gharcha Swaad
0:00 / 0:00
अशा नवीन पद्धतीने घरी बनवा रसदार लेअरवाली बालूशाही | Balushahi Recipe | Badusha | Khurmi
144 651 просмотр · 7 лет назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
144 651 просмотр · 7 лет назад
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Buy Meyer Pans: http://bit.ly/2MOwoDI
[ Use Code: GS15 ] and get 15% Discount
Sajuk Tup Recipe | Pure clarified butter - • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...
साहित्य - १५० ग्रॅम मैदा, ५० ग्रॅम साजूक तूप, ५० मीली साधे पाणी, १ tsp मीठ, १ tblsp दही, ¼ tsp बेकिंग सोडा, पाकासाठी - १ कप किंवा १०० ग्रॅम साखर आणि साखरेच्या १" ( इंच ) वर मावेल इतके पाणी, १ tsp वेलदोडे आणि जायफळ पावडर, १०/१२ केसरच्या काड्या. सजविण्यासाठी पिस्ता आणि बादाम, तळण्यासाठी साजूक तूप.
कृती - परातीत मैदा चाळून घ्या. त्यात ५० ग्रॅम साजूक तूप, ५० मीली साधे पाणी, १ tsp मीठ, १ tblsp दही, ¼ tsp बेकिंग सोडा इत्यादी घालून चांगले एकजीव करा आणि मऊ बुळबुळीत असा गोळा तयार करून त्याला १० मिनिटे मुरवत ठेवा. एका पातेल्यात साखर आणि साखरेच्या १" ( इंच ) वर मावेल इतके पाणी घालून पहिली उकळी काढा आणि त्यात वेलदोडे आणि जायफळ पावडर, १०/१२ केसरच्या काड्या घालून हाताला चिकटेल असा पाक तयार करा. ( एकतारी किंवा दोनतारी पाक नव्हे ) १० मिनिटांनी पिठाचा गोळा पुन्हा मळून घ्या आणि त्याला किचनच्या ओट्यावर जाडसर थापून त्याचे ३ भागात विभागणी करा. तिन्ही भाग एकमेकांवर ठेवून पुन्हा त्याला थापून घ्या. हीच प्रक्रिया ७ वेळा करून घ्यावी. आता त्याचे छोटे गोळे बनतील इतके काप करून घ्यावे. आता व्हिडिओमध्ये दाखविल्या प्रमाणे बालूशाहीचा आकार देत सर्व बालुशाही तयार करून घ्या आणि त्यांना गरम साजूक तुपात मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या. बालुशाही गरम असतानाच पाकात घोळून २ मिनिटे पाकात मुरवूनसुद्धा घ्या. बालुशाही पिस्ता आणि बदामाच्या कापांनी सजवून घ्यावी. हि बालुशाही १० दिवस टिकते.
#balushahi #badusha #khurmirecipe
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com