अभंग - तुका म्हणे माझा सखा पांडुरंग...
शब्द सूर संवादु
0:00 / 0:00
अभंग - तुका म्हणे माझा सखा पांडुरंग...
39 149 просмотров · 1 год назад
शब्द सूर संवादु
696 подписчиков
39 149 просмотров · 1 год назад
तुका म्हणे माझा सखा पांडुरंग
व्यापियेले जग तेणे एके॥धृ॥
हरिचिया भक्ता नाही भय चिंता
दुःख निवारीता नारायण॥१॥
न लगे वाहणे संसार उद्वेग
जडो नेदी पांग देवराया॥२॥
असो द्यावा धीर सदा समाधान
आहे नारायण जवळीच॥३॥
रचना: संत तुकाराम
संगीत: संगीता भिडे