Drone Shoot in Gorakshnath Tekadi श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी सप्ताह ड्रोन क्षणचित्रे #beed #viral
युवा उत्कर्ष - Dhananjay Gundekar
0:00 / 0:00
Drone Shoot in Gorakshnath Tekadi श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी सप्ताह ड्रोन क्षणचित्रे #beed #viral
12 911 просмотров · 4 г. назад
युवा उत्कर्ष - Dhananjay Gundekar
7,79 тыс. подписчиков
12 911 просмотров · 4 г. назад
#बीड #अध्यात्म #वारकरी #maharashtra #india #warkari #vitthal #dronephotography #drone #dronevideo #dronefootage #dronefootage
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी संस्थान येथे लोटला लाखोंचा भक्तीसागर
बीड तालुक्यातील गोरक्षनाथ टेकडी येथे संत ह.भ.प.वै.किसन बाबा यांच्या 24 व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवर्य, ह.भ.प.शांतिब्रम्ह नवनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांच्या काल्याची कीर्तनाने झाली. या अखंड हरिनाम सप्ताह सांगतेवेळी जिल्हाभरातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थिती लावत अध्यात्मिक पर्वणीचा लाभ घेतला.
गेल्या 8 दिवसांपासून श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी संस्थान येथे पंढरी अवतरली होती. सप्ताहानिमित्त विविध अध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांनी आपल्या कीर्तनातून भाविकभक्तांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले. लाखो भाविक भक्तांसह अध्यात्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
धनंजय गुंदेकर
संपादक - युवा उत्कर्ष
Dhananjay Gundekar Beed