Перейти к содержимому

खमंग, खुसखुशीत भाजणीची चकली | घरच्या घरी चकलीची भाजणी कशी तयार करावी? | Crispy Bhajani Chakli

Archies Kitchen

0:00 / 0:00

खमंग, खुसखुशीत भाजणीची चकली | घरच्या घरी चकलीची भाजणी कशी तयार करावी? | Crispy Bhajani Chakli

190 просмотров · 2 дн. назад
Archies Kitchen
253 подписчика
190 просмотров · 2 дн. назад
नमस्कार मंडळी! आज आपण बनवणार आहोत खमंग, खुसखुशीत आणि चवीला अगदी अप्रतिम अशी भाजणीची चकली. दिवाळी फराळासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी ही घरगुती भाजणीची चकली एकदम परफेक्ट आहे. या चकलीची खासियत म्हणजे घरच्या घरी तयार केलेली भाजणी. योग्य प्रमाणात धान्य आणि डाळी भाजून त्यांची भाजणी तयार केली, तर चकली छान खुसखुशीत आणि चविष्ट बनते. चकलीच्या भाजणीसाठी लागणारे साहित्य: • तांदूळ -- 500 gm. • हरभऱ्याची डाळ -- 200 gm • मूग डाळ -- 100 gm • उडदाची डाळ -- 100 gm. • साबुदाणा -- 1 चमचा • जाड पोहे -- 100 gm. • जिरे -- 20 gm • धने-- 20 gm भाजणी तयार करण्याची पद्धत: सर्वप्रथम तांदूळ, हरभऱ्याची डाळ, मूग डाळ, उडदाची डाळ, साबुदाणा, जाड पोहे, जिरे आणि धने हे सर्व साहित्य वेगवेगळे किंवा योग्य पद्धतीने मंद आचेवर छान भाजून घ्यावे. सर्व साहित्य थंड झाल्यानंतर ते एकत्र करून गिरणीतून बारीक दळून घ्यावे. अशा प्रकारे आपली खमंग आणि चविष्ट चकलीची भाजणी तयार होते. या भाजणीपासून तयार केलेली चकली छान कुरकुरीत आणि खुसखुशीत बनते. व्हिडिओ आवडल्यास Like करा, आपल्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी Archie’s Kitchen या चॅनेलला Subscribe करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा! #भाजणीचीचकली #खुसखुशीतचकली #चकली #दिवाळीफराळ #घरगुतीचकली #BhajaniChakli #CrispyChakli #ArchiesKitchen