🌿 पुण्याजवळ अशी सुंदर ठिकाणं पाहिली! |भोर, रावेत नर्सरी ते तिकोना व्हॅली फार्म 🏞️#driverlife
Kokani gandhar
0:00 / 0:00
🌿 पुण्याजवळ अशी सुंदर ठिकाणं पाहिली! |भोर, रावेत नर्सरी ते तिकोना व्हॅली फार्म 🏞️#driverlife
8 665 просмотров · 1 день назад
Kokani gandhar
12,9 тыс. подписчиков
8 665 просмотров · 1 день назад
🙏 नमस्कार मित्रांनो! स्वागत आहे आपल्या Kokani Gandhar या YouTube चॅनलवर! ❤️
आजच्या ब्लॉगमध्ये आपण सांगलीहून भोर येथे पोहोचल्यानंतरच्या प्रवासाची मजेशीर सफर अनुभवणार आहोत. रात्री HP पेट्रोल पंपावर आराम केल्यानंतर सकाळी फ्रेश होऊन गणपती बाप्पाचं नाव घेत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. वाटेत मस्तपैकी मिसळपावचा नाश्ता केला आणि पहिल्या लोकेशनवर पोहोचलो.
📍 पहिलं लोकेशन – नेकलेस पॉईंट, भोर परिसर! निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण, उंचावरून दिसणारं धरण आणि नागमोडी वळणं घेत वाहणारी नदी यांचं सुंदर दृश्य पाहायला मिळालं. याच परिसरात मराठी अभिनेते दादा कोंडके यांचं गावही आहे.
🌳 दुसरं लोकेशन – रावेतजवळील सुंदर नर्सरी! जवळपास ८ एकर परिसरात पसरलेली ही नर्सरी पाहायला मिळाली. विविध प्रकारची झाडं, गाय-म्हशी आणि निसर्गाच्या सान्निध्यातील सुंदर वातावरण अनुभवायला मिळालं.
⛰️ तिसरं लोकेशन – तिकोना व्हॅली फार्म! तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या सुंदर फार्मकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उसाची आणि भाताची हिरवीगार शेती पाहायला मिळाली. फार्मवर पोहोचल्यानंतर शिंदे सरांची भेट झाली. त्यांनी फार्मची माहिती दिली आणि जेवणासाठी आग्रहही केला. पण पुढे आणखी एक बुकिंग असल्यामुळे त्यांचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो.
एका दिवसात तीन वेगवेगळ्या लोकेशनवर गाडी खाली करण्याचा अनुभव, सुंदर निसर्ग, हिरवीगार शेती आणि टेम्पो ड्रायव्हरच्या आयुष्यातील धावपळ या सगळ्यांचा अनुभव घ्या आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये!
❤️ मित्रांनो, ब्लॉग आवडला तर LIKE करा, आपल्या मित्रांसोबत SHARE करा आणि अशाच कोकणातील, महाराष्ट्रातील प्रवासाच्या आणि टेम्पो ड्रायव्हरच्या जीवनातील भन्नाट गोष्टी पाहण्यासाठी आपल्या Kokani Gandhar चॅनलला SUBSCRIBE करायला विसरू नका!
🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️
#KokaniGandhar
#Bhor
#NecklacePoint
#TikonaValleyFarm
#TikonaFort
#PuneTravel
#TempoDriver
#TransportVlog
#MarathiVlog
#MaharashtraTourism
#NatureLovers
#मराठीव्लॉग
#टेम्पोड्रायव्हर
#प्रवासवर्णन