Перейти к содержимому

Mumbai Dabbawala Case Study: 99.99% Accuracy तरीही Mumbai Dabbawala बिझनेस 136 वर्षांनी फेल का गेला?

Unseen Marathi

0:00 / 0:00

Mumbai Dabbawala Case Study: 99.99% Accuracy तरीही Mumbai Dabbawala बिझनेस 136 वर्षांनी फेल का गेला?

1 003 просмотра · 5 дней назад
Unseen Marathi
107 тыс. подписчиков
1 003 просмотра · 5 дней назад
अण्णा भाऊ साठेंच्या या अजरामर ओळी आपण सगळ्यांनीच ऐकल्यात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात मुंबईत कष्ट करणाऱ्या कष्टकऱ्याची, कामगाराची व्यथा म्हणजे शाहिरांची "माझी मैना"... पण याच मुंबईत पोटाची खळगी भरायला आलेला माणूस आणि गावाकडे त्याची वाट पाहणारं कुटुंब... या दोघांना जोडणारा एक खूप मोठा दुवा म्हणजे—'मुंबईचा डब्बेवाला'! कारण मुंबईत धावणाऱ्या त्या डब्बेवाल्याच्या डोक्यावर फक्त एका कर्मचाऱ्याचं जेवण नसायचं.., तर गावाकडून आलेला तोच 'आपुलकीचा आणि घरच्या मायेचा घास' असायचा. आज जगातल्या मोठ्या कंपन्या जीपीएस, एआय आणि करोडो रुपयांचे सॉफ्टवेअर वापरून लॉजिस्टिक्स चालवतात. पण मुंबईतली ही साधी घाटावरची माणसं कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय रोज लाखो लोकांपर्यंत वेळेवर घरचा डबा पोहोचवायची. आणि याच सिस्टीमचं कौतुक Harvard पासून ते अगदी फोर्ब्सपर्यंत सगळ्यांनी केलं. अण्णा भाऊंच्या कवितेतली तीच माणुसकी जपून जगाला मॅनेजमेंट शिकवणारा हा बिझनेस... मुंबई म्हटलं की धावणारी लोकल ट्रेन, पावसाची घाई आणि वेळेशी शर्यत लावणारी माणसं. यासोबत आणखी एक चित्र डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पांढरा कुर्ता, डोक्यावर गांधी टोपी आणि सायकलवर डबे घेऊन धावणारा डब्बेवाला! ही story आहे मुंबईच्या डब्बेवाल्यांची. एका छोट्या गरजेतून सुरू झालेल्या business ची… जगभर management model बनलेल्या एका system ची… आणि आता बदलत्या मुंबईत स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाची. Interesting stories, podcasts, interviews, explainers, hidden facts, cinema, history, current affairs आणि वेगवेगळ्या विषयांवरील informative content. तसंच अशाच meaningful stories, insightful conversations आणि unseen angles साठी चॅनेलला Subscribe करा. ‪@unseenmarathi‬ तुमचं मत आणि suggestions Comment मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडीओजसाठी UnseenMarathiला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडीओजचे अपडेट लगेच मिळवण्यासाठी नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. Instagram :   / unseen.marathi   Facebook :   / unseenmarathi